आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण समितीवरून नगरसेवक समर्थकांचा पत्ता कट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षणमंडळ बरखास्त झाल्यानंतर अाता शासन अादेशानुसार महापालिका शिक्षण समिती गठित करण्यासाठी प्रयत्न करीत असून, यापूर्वी नगरसेवक समर्थकांना संधी देण्यासाठी नावाजलेली असलेल्या समितीवर अाता फक्त नगरसेवकांचीच वर्णी लागणार अाहे. स्थायी समितीप्रमाणेच शिक्षण समितीची रचना हाेणार असल्यामुळे नगरसेवक सुखावले अाहेत.
पालिकेशी संबंधित शिक्षण मंडळ बरखास्त करून शासनाने शिक्षण समिती गठित करण्याचे यापूर्वीच अादेश दिले अाहेत. मुळात शिक्षण समिती गेल्या काही वर्षंात खासकरून ज्यांना नगरसेवकपदाची उमेदवारी मिळाली नाही किंबहुना पक्षांतर्गत स्थानिक पातळीवर ज्येष्ठ असलेल्यांचे पुनर्वसन करण्याचे माध्यम म्हणून बघितली जात हाेती. त्यातून विषय थेट शिक्षणाशी निगडित असतानाही मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्यांची वर्णी त्यावर लागल्याचेही चित्र बघायला मिळाले. दरम्यान, सदस्यनिवडीसंदर्भात हाेणारे वाद लक्षात घेता, अाता नवीन शिक्षण समितीची रचना महत्त्वाची मानली जात अाहे. ही समिती अाता स्थायी समितीप्रमाणेच गठित करण्याचे पालिकेचे प्रयत्न अाहेत. त्यासाठी शिक्षण मंडळाप्रमाणेच समितीवरही १६ सदस्य घेतले जातील. त्यातून एक सभापती उपसभापती निवडला जाईल. त्यांचा कार्यकाळ एकच वर्षाचा असेल. अद्याप समितीच्या रचनेबाबत शासनाचे अादेश अालेले नाहीत. महासभेवर प्रस्ताव ठेवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न नगरसचिव विभागाचा अाहे.