आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनागोंदी: कपाशी बियाण्यांचा काळाबाजार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला: गेल्या महिन्यात कापसाच्या बी.टी. बियाणे 7351 साठी उद्रेक होऊन शेतकर्‍यांवर लाठीहल्ला झाल्यानंतरही बियाण्यांचा काळाबाजार सुरू आहे. तालुक्यात बियाण्यांची टंचाई दाखविताना मात्र मागणी असतानाही येथील बियाण्यांचे व्यापारी बाहेरच्या तालुक्यामध्ये याच कपाशी बियाण्यांचा पुरवठा करीत असल्याचे सिध्द झाले आहे.
व्यापार्‍यांनी कृषी विभागाला सादर केलेल्या याद्यांमध्ये काळाबाजार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या विक्रीच्या याद्यानुसार जिल्हय़ातील 12 हजार 900 बी.टी. 7351 या वाणाच्या पाकिटांपैकी येवले तालुक्यात सहा हजार 644 पाकिटे विक्रीसाठी आली होती. यात उपलब्ध पाकिटांपैकी नंदा सीडस यांनी तीन हजार 980 पाकिटांमधील 1442, अजित कृषी भांडार यांनी 1260 पाकिटांमधील 504 पाकिटे, एकनाथ खेमचंद अँग्रो सेंटर यांनी 1404 पाकिटांपैकी 431 पाकिटांची बाहेरील कृषी सेवा केंद्रांना विक्री केली आहे. दोन हजार 377 पाकिटे बाहेरगावी विक्री झाल्याने शेतकर्‍यांच्या वाट्याला केवळ चार हजार 267 पाकिटे आली आहेत. शहरातील कृषी सेवा केंद्रांमार्फत यातील दोन हजार 680 तर ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रांमार्फत एक हजार 587 पाकीटांची विक्री केली आहे.