आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेट सीट बेल्ट वापरासाठी २० हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रादेशिक परिवहन विभागाच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत दोन दिवसांत २० हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संगीतमय प्रबोधन करण्यात आले. हेल्मेट सीट बेल्ट वापरण्यासाठी विभागाने तरुणांमध्ये सुरू केलेल्या जनजागृतीचा प्रभाव पडत असल्याने महाविद्यालयांतील पार्किंग स्थळांवर हेल्मेट लावलेल्या वाहनांची संख्या वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे.

रस्ता सुरक्षा अभियानास दि. १० जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, दि. २४ जानेवारीपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. या अभियानांतर्गत आरटीओ विभागाकडून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. सीट बेल्ट हेल्मेट वापरासंबंधी विभागाने संगीतमय जनजागृती सुरू केली आहे. महाविद्यालयांमध्ये ‘डेज््’ची रेलचेल सुरू असून, त्यात ‘आरटीओ’कडून संगीतमय पद्धतीने हेल्मेट सीट बेल्ट वापराचे महत्त्व पटवून दिले जात असल्याने त्याकडे असंख्य तरुण आकर्षित होऊन सीट बेल्ट हेल्मेट वापरण्याची शपथ घेत आहेत. चार दिवसांत १२ महाविद्यालयांत आरटीओ विभागाकडून जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

के. के. वाघ, भुजबळ नॉलेज सिटी, सकपाळ नॉलेज हब, संदीप फाउंडेशन, केटीएमएम, पंचवटी आणि इतर महाविद्यालयांतील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी वाहतूक नियम रस्ता सुरक्षेबाबत धडे दिले. कार्यक्रम घेतलेल्या महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या दिवशी भेट दिल्यानंतर ८५ टक्के दुचाकींवर हेल्मेट लावलेले अाढळून आले. हेल्मेट सीट बेल्ट वापरण्याच्या आवाहनास व्यापक स्वरूपात प्रतिसाद मिळत असल्याने आरटीअो महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना हेल्मेट वापरण्याची शपथ दिली जात आहे.

महामार्गावर वाहनांना रिफ्लेक्टर्स चिकटविताना ‘आरटीओ’चे भरत कळसकर. समवेत मनीष काेठारी, नरेंद्र बिरार अादी.

तरुणाईकडून प्रतिसाद...
अभियानांतर्गतहेल्मेटसीट बेल्ट वापरण्यासाठी प्रभावी जनजागृती सुरू आहे. ही मोहीम प्रभावीपणे पुढे जात अाहे. तरुणाईचा प्रतिसाद मिळत असून, हेल्मेट वापरण्याची ‘क्रेझ’ निर्माण होत आहे. भरत कळसकर, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी
साडेचारहजार अभियंत्यांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या इन्स्टिट्यूट अाॅफ इंजिनिअर्स, नाशिक सेंटरतर्फे शुक्रवारी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात अाले. प्रादेशिक परिवहन अधिकारी अाणि राेठे एर्डे इंडिया कंपनीच्या सहकार्याने गाेंदे परिसरात महामार्गावर राबविलेल्या या अभियानांतर्गत वाहनचालकांना सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगतानाच वाहनांना रिफ्लेक्टर्सचे चिकटविण्यात अाले.
वाडीवऱ्हे शिवारातील महाविद्यालयाच्या मैदानावर रस्ता सुरक्षेसाठीच्या उपाययाेजना काळजी घेण्याबाबत विशेष कार्यक्रम घेण्यात अाला. यात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उद्याेग निरीक्षक प्रवीण पाटील, इन्स्टिट्यूट अाॅफ इंजिनिअर्स, नाशिक सेंटरचे माजी चेअरमन नरेंद्र बिरार, चेअरमन मनीष काेठारी, सचिव सुमित खिंवसरा, जयंत देशपांडे, राेठे एर्डेचे प्रभाकर उमाळे सहभागी झाले होते. या वेळी सातशेवर वाहनांना रिफ्लेक्टर्स चिकटविण्यात आले.