आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थावर मिळकत व्यवहारांबाबत विशेष परिसंवाद, तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्थावर मिळकत व्यवहारांसंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या असोसिएशन ऑफ रियल इस्टेट कन्सल्टंट्स संघटनेच्या वतीने शनिवारी (दि 6) सकाळी 9.30 ते 1 या वेळेत कालिदास कलामंदिरात स्थावर मिळकत व्यवहार या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते, मुद्रांक जिल्हाधिकारी रमेश काळे, क्रेडाई, नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात जिज्ञासूंना
मिळणार आहे.
अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड. वसंत तोरवणे, अ‍ॅड. दिलीप राठी, अ‍ॅड. विद्युल्लता तातेड या कायदेतज्ज्ञांचाही या कार्यक्रमात सहभाग असेल, अशी माहिती असोसिएशन ऑफ रियल इस्टेट कन्सल्टंट्सचे अध्यक्ष डी. जे. धामणे, उपाध्यक्ष राजेंद्र कोतकर, सेक्रेटरी प्रशांत अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिवसेंदिवस विकास होणाऱ्या नाशिकच्या सोबतच येथील स्थावर मिळकतीचेही महत्त्व वाढत आहे. दुसरीकडे, स्थावर मिळकतीशी संबंधित कायदेविषयक सोपी प्रक्रिया, नवीन शासकीय बदल, विधी व नियमांबाबत ग्राहक अनभिज्ञ असल्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्या प्रबोधनासाठी हा कार्यक्रम लाभदायी असून, तो विनामूल्य आहे. यावेळी मार्गदर्शक शंकांचे निरसन करणार असल्याचे धामणे यांनी स्पष्ट केले.