आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Councillors Are Aggressive Due To Water Shortage

पाणीटंचाईवरून गदारोळ, शहरातील सर्वच भागांतील नगरसेवक आक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गंगापूर धरणात मुबलक पाणी असताना शहरात अधिकाऱ्यांकडूनच कमी दाबाने पाणीपुरवठा करण्याचे षड‌्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर आराेपांचा हल्ला चढवला. खासकरून सिडकोतील महिला नगरसेवकांनी व्हॉल्व्हमन पाणी सोडण्यामागे अधिकारीच असल्याचा आराेप करीत कारवाईची मागणी केली.

दरम्यान, महापौर अशोक मुर्तडक यांनी पाण्यासंदर्भातील तक्रार निवारणासाठी विभागीय समिती तयार कराव्यात. तसेच हॉल्व्हमनपासून तर अभियंत्यांपर्यंत सर्वांचे संपर्क क्रमांक नगरसेवकांना द्यावे, असे आदेश दिले. महासभा सुरू होण्यापूर्वीच नगरसेवकांनी पाणीप्रश्नाला हात घातला.
तानाजी जायभावे यांनी सिडको सातपूरमध्ये कमी दाबाने पाणी येण्यामागे शहरातील अन्य विभागात दोन वेळा होणारा पुरवठा कारणीभूत असल्याचा आरोप केला. त्यानंतर मात्र शाेभा निकम यांनी रायगड चौकात अचानक खंडित झालेला पाणीपुरवठा बच्छाव या अभियंत्यांनी केलेली टाळाटाळ या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर कल्पना पांडे, रत्नमाला राणे अन्य नगरसेविकाही संतप्त झाल्या. फाेन करूनही अधिकारी दाद देत नसल्यामुळे लोकांना कसे
तोंड द्यायचे, असा सवाल निकम यांनी केला तर, सिंधुताई खोडे यांनी म्हसरूळला आंदोलन करूनही पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. नगरसेविकांचा रुद्रावतार बघून अखेर महापौर मुर्तडक यांनी सर्व अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याची तंबी दिली. पाण्याविषयी तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाही अधिकाऱ्यांनी त्याकडे काणाडोळा करू नये, अशाही सूचना केल्या.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मुकणेवरून मनसे-शिवसेनेत वाद...