आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Councillors Commissioner Controversy Issue At Nashik

नगरसेवक-आयुक्तांमध्ये खडाजंगी, नगरसेवक निधीतील कामे रखडल्याने तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मोरवाडीयेथील कामांच्या मंजुरीवरून काँग्रेसचे माजी गटनेते लक्ष्मण जायभावे पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यात मंगळवारी सायंकाळी जोरदार खडाजंगी झाली. अभ्यागतांच्या भेटीदरम्यान दोघांचाही चढलेला आवाज आरोप-प्रत्यारोप यामुळे महापालिकेतील वातावरण ढवळून निघाले.

महासभेत नगरसेवक निधी ५० लाखांपर्यंत देण्याचा निर्णय झाल्यानंतरही धुसफूस सुरूच आहे. मंगळवारी खुद्द उपमहापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक राहुल दिवे, सतीश सोनवणे यांनीही भेटी घेऊन प्राधान्यक्रमाची कामे सुचवली. सायंकाळच्या सुमारास जायभावे यांनी आयुक्तांशी चर्चा सुरू केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला. तीन वेळा लेखी कामे दिल्यानंतरही पुन्हा कामे कागदावर लिहून कशासाठी द्यायचे, असा सवाल त्यांनी केला. आपल्या प्रभागात एकही काम झाल्याची तक्रारही त्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी आक्रमक पवित्रा घेत जायभावे यांच्या प्रभाग ४४ मध्ये कोटी २५ लाखांच्या कामांची देयकेही अदा झाल्याचे सांगितले. त्यावर ही कामे मागील वर्षाची असल्याचा पवित्रा जायभावे यांनी घेतला. कामे करणार नसाल तर आंदोलन करण्याची वेळ येईल, असा इशारा जायभावे यांनी दिल्‍यानंतर मात्र वाद चिघळला. रात्री १२ वाजेपर्यंत थांबून कामे करूनही उपयोग नसेल तर काय करावे, असा सवाल केला. दरम्यान, येथील नगरसेवक उपस्थित काहींनी उभयंतांच्या वादात मध्यस्थी करून दोघांनाही शांत केले.

अधिकारीयेणार गोत्यात : पंधरावेळा सांगूनही नगरसेवकांच्या प्राधान्यक्रमाच्या कामांची यादी सादर करणारे अधिकारी आता गोत्यात येणार असून, आयुक्तांनी स्पष्ट शब्दात तसे जाहीर केले.

आयुक्त भडकले
-दोनवेळा लेखी कामांची यादी दिल्‍यावर दखल घेतली नाही. तीच बाब आयुक्तांना विचारल्यावर ते भडकले. त्यांनी पुन्हा लिहून द्या असे सांगत वही टेबलवर फेकली. लक्ष्मणजायभावे, माजीगटनेते तथा नगरसेवक, काँग्रेस

प्रत्येकाचीकामे होतील
-उपलब्ध निधीप्रमाणे प्रत्येकाची कामे केली जातील. जायभावेंचा अपमान केला नाही. फक्त कामे कोणती हे पुन्हा िलहून मागितले. डॉ.प्रवीण गेडाम, आयुक्त,महापालिका