आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल व्हॅनद्वारे ‘न्यायालय आपल्या दारी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘न्यायालय आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे विधी सेवा केंद्र आणि लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावर प्रथमच मोबाइल व्हॅनद्वारे पक्षकारांना मोफत न्याय मिळवून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ, नाशिक यांच्या वतीने मोफत विधी सेवा केंद्र आणि लोकअदालत 16 ते 30 जून या कालावधीत नाशिक जिल्ह्यात आयोजित केली आहे. व्हॅनद्वारे तालुक्यात फिरून पक्षकारांना न्याय मिळवून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा इंदिरा जैन यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास नाशिक मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी व वकील संघाचे अध्यक्ष अँड. नितीन ठाकरे, सदस्य, ज्येष्ठ विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील वकील, पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेश पटारे यांनी केले आहे.

प्रथमच असा उपक्रम : मोबाइल व्हॅन पक्षकारांच्या दारी जाण्याचा प्रथमच प्रयोग होत आहे. व्हॅन मुंबई, औरंगाबाद, नागपूर या खंडपीठाकडे आहे. सिंधुदुर्ग येथे सेवा देऊन नाशिक येथे आली आहे. प्रथमच तालुक्याच्या ठिकाणी व्हॅनद्वारे मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
कारागृहातही जाणार व्हॅन : मोबाइल व्हॅन कारागृहातही जाणार आहे. तेथे बंदीवानांना निवृत्त न्यायाधीशांकडून सल्ला देण्यात येणार आहे.

काय आहे मोबाइल व्हॅन : ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमातील मोबाइल व्हॅनमध्ये पक्षकारांना आपले म्हणणे मांडता येईल. निवृत्त न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी यांना बसण्याची व्हॅनमध्येच सुविधा आहे.

पक्षकारांनी लाभ घ्यावा
पंधरा दिवस व्हॅन नाशिकमध्ये आहे. यादरम्यान आदिवासी तालुक्यांसह इतर तालुक्यांत कायद्याप्रमाणे न्याय मिळवून देण्यात येईल. या योजनेचा पक्षकारांनी लाभ घ्यावा. - राजेश पटारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण