आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारी अभियंता पाटील यांना कोणत्याही क्षणी अटक, न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अाेझर विमानतळावर झालेल्या अाेल्या पार्टीचे अायाेजक ठेकेदार विलास बिरारी यांच्या अटकेपाठाेपाठ अाता या पार्टीला नियमबाह्य परवानगी देणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अार. टी. पाटील यांनाही काेणत्याही क्षण अटक हाेऊ शकते. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. परंतु, त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. जी. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अाेझर विमानतळावर अायाेजित केलेली पार्टी चांगलीच वादग्रस्त ठरली अाहे. तिची साग्रसंगीत मजा लुटणारे बांधकाम खात्यातील अधिकारी, ठेकेदार यांना सार्वजनिक जागेवर अशा प्रकारचे कृत्य करीत असल्याचे भानच राहिले नसल्याचे पाेलिसांनी त्यांच्या अहवालात म्हटले अाहे. अायाेजक ठेकेदार िबरारी यांनी पाेलिस काेठडीत असताना तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती तपासी पथकाच्या हाती लागली. त्यामुळे अनेक बडे अधिकारी गाेत्यात येण्याची शक्यता अाहे. त्यांचीही नावे या गुन्ह्यात दाखल केली जाणार अाहेत. तत्पूर्वी कार्यकारी अभियंता अार. टी. पाटील यांनी अटक हाेऊ नये, यासाठी न्यायालयात धाव घेतली हाेती.
पाटील यांना काेणत्याही क्षणी अटक-
न्यायालयानेपाटील यांना तात्पुरता दिलासाही देता दाेनच दिवसात अर्ज सुनावणीसाठी ठेवला. साेमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल खडसे यांच्यासमाेर त्यावर सुनावणी झाली. सरकारी वकील राजेंद्र घुमरे यांनी पाेलिसांच्या अहवालानुसार पाटील यांना अटकपूर्व जामीन देण्यास विराेध केला. संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवर पार्टी अायाेजनाला परवानगी देताना नियमांचे पालन केलेले नाही. स्थानिक पाेलिसांची परवानगी बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात अाले. त्यामुळे जामीन देण्याची विनंती अॅड. घुमरे यांनी केली. अखेरीस न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला.

निलंबनाची कारवाई हाेण्याची चर्चा
दरम्यान,पार्टीला परवानगी दिल्याप्रकरणी पाटील यांना निलंबित केल्याची चर्चा साेमवारी हाेती. मात्र, तसे अादेश प्राप्त नसल्याचे अधीक्षक अभियंता उकीरडे यांनी सांगितले. या प्रकरणाची बांधकाम खात्याच्या मुंबईतील मुख्यालयातून विशेष पथकामार्फत यापूर्वीच चाैकशी झाली अाहे. त्यांच्या अहवालाकडे अाता लक्ष लागले अाहे.