आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत पत्नीला जाळून मारणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घरगुती भांडणातून पत्नीच्या अंगावर राॅकेल अाेतून जाळून मारल्याप्रकरणी पतीस जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठाेठावली. यामध्ये चेतनानगर भागातील रहिवासी प्रसाद सुधाकर कुलकर्णी यास न्यायालयाने शिक्षा सुनावली असून, न्यायालयाच्या या निकालाने विवाहितेच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले अाहे. 
 
चेतना नगरला पाैर्णिमा अपार्टमेंटमध्ये प्रसाद त्याची पत्नी कीर्ती रहात हाेते. दाेघांत लग्नापासून वारंवार वाद हाेत. प्रसाद दारू पिऊन तिला मारहाण करायचा. असाच १२ मे २०११ राेजी रात्री दारूच्या नशेतच कामावरून घरी परतला असता पत्नीने त्यास हटकले. दाेघांत वाद हाेऊन प्रसादने कीर्तीच्या अंगावर राॅकेल फेकून पेटवून दिले. यात गंभीर भाजलेल्या कीर्तीने प्रचंड अाक्राेश केला. तिचा अावाज एेकून अाणि धूर बघून रहिवाशांनी तत्काळ घरात घुसून जखमी कीर्तीला सिव्हिल दाखल केले. मात्र, ९५ टक्के भाजलेल्या कीर्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत संशयित प्रसादविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा सत्र न्यायाधीश सुचित्रा घाेडके यांच्यासमाेर गुन्ह्याचा खटला चालून प्रसादविरुद्ध सबळ पुरावा अाढळून अाल्याने जन्मठेपेची शिक्षा पाच हजारांचा दंड सुनावण्यात अाला. यात सरकार पक्षातर्फे विद्या डी. जाधव यांनी युक्तिवाद केला. 
 
रहिवासी, डाॅक्टरांचे पुरावे 
- घटनेनंतर जवळपास दीड वर्षानंतर या प्रकरणाचा फेरतपास करून नव्याने पुरवणी दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले हाेते. यात घटनास्थळी दाखल डाॅक्टर ज्या रुग्णवाहिकेतून तिला रुग्णालयात नेले, त्या चालकाचा अाणि कीर्तीला ज्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, त्या रहिवाशांचे जबाब नाेंदविण्यात अाले. त्यांच्या साक्षीही न्यायालयाने ग्राह्य धरल्या असून, या शिक्षेत रहिवाशांच्या साक्षीही महत्त्वपूर्ण ठरल्या. कीर्तीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात पाेलिस यशस्वी ठरले.
-संजय सानप, तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक 
बातम्या आणखी आहेत...