आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cows Are Treated With The Help Of The Social Organization

खऱ्या अर्थाने हॅपी झाला बर्थ डे... तडफडणाऱ्या गायीवर सामाजिक संस्थेच्या मदतीने केले उपचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाविद्यालयातवाढदिवस साजरा करायला जाण्यासाठी त्याची लगबग.. मित्रांचे फाेनवर फाेन... घाईगडबडीतच ताे निघाला, पण रस्त्यातच कडेला एक गाय जखमी अवस्थेत हंबरडा फाेडताना दिसली. बघ्यांची गर्दी.. एकाला विचारले तर म्हणाला, गाडीने धडक दिली. मात्र, डाॅक्टरांना बाेलावण्याची तसदी घ्यायला काेणीच तयार नाही. अखेर त्या तरुणाने ‘वाढदिवसाचं बघू नंतर’ म्हणत गायीला उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणांकडे मिनतवारी सुरू केली. मात्र, एकाच्याही हृदयाला पाझर फुटेना. अखेर प्राणी बचाव संघटना पदाधिकाऱ्यांच्या मदतीने उपचार करीत तिची वेदनांतून सुटका केली. माणसुकी हरवत चाललेल्या दुनियेत भूतदयेचा अादर्श उभा करत साजरा केलेला हा अनाेखा वाढदिवस.
गंगापूररोडवरील जेहान सर्कल परिसरात एका गायीच्या पायाला वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखम झाली. वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेला कौस्तुभ बागवडे त्याचा मित्र उबेद मिसगर यांनी अग्निशामक दल, पोलिस कंट्रोल, महापालिका, पशुसंवर्धन विभाग... सर्वाना दूरध्वनी केले. त्यांच्याकडून ‘गायीला आणण्यासाठी वाहन नाही, तुम्हीच गाडी करून जनावरांच्या दवाखान्यात घेऊन जा’, अशी नेहमीची उत्तरे मिळाली. इकडे गायीच्या पायातून रक्तस्त्राव सुरूच होता. अखेर ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात दूरध्वनी करून कौस्तुभने ही घटना सांिगतली. सामाजिक बांधिलकी म्हणून ‘दिव्य मराठी’ने त्वरित प्राणी बचाव संघटनेचे गौरव क्षत्रिय यांना दूरध्वनी केला. क्षत्रिय यांनी जनावरांच्या डॉक्टरांच्या मदतीने जखमी गायीवर उपचार केले. त्यानंतर दहा मिनिटांतच गायीच्या डाेळ्यात समाधान झळकले. कौस्तुभने भविष्यात मुक्या जनावरांसाठी काम करण्याचा संकल्पही वाढदिवसानिमित्त केला.
तरुणांचा हवा पुढाकार
मुक्याजनावरांनाही माणसांप्रमाणेच भावना असतात. त्यामुळे प्रत्येक तरुणाने मुक्या जनावरांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गौरवक्षत्रिय, प्राणीबचाव संघटना
पशुधनाच्या सेवेचा संकल्प
जखमीगायीला मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते. भविष्यात मुक्या जनावरांसाठी काम करण्याचे ठरविले आहे. - कौस्तुभबागवडे, महाविद्यालयीन विद्यार्थी