आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेकलेले ब्लेड, खिळे गायींच्या पाेटात; मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दाढी केल्यानंतर अनेक जण ब्लेड कचऱ्यात फेकून देतात. गंजलेले खिळे, स्क्रू यांसारख्या वस्तूही केरात फेकल्या जातात. परंतु, काही महाभाग हा केरकचरा रस्त्यावरच टाकतात. यामुळे परिसर तर अस्वच्छ हाेताेच; शिवाय कचरा खाण्यासाठी अालेल्या भटक्या जनावरांच्याही पाेटात या धारदार वस्तू जात असल्याची गंभीर बाब समाेर अाली अाहे. बेवारस गायींची शुश्रूषा करणाऱ्या गाेशाळाचालकांना हा अनुभव प्रकर्षाने येत अाहे.
 
अाजारी, भाकड अाणि साेडून दिलेल्या गायींवर उपचार करून त्यांचे पालनपाेषण करण्याचे काम नाशिकमधील कृषी गाेशाळा, मंगलरूप गाेवत्स सेवा ट्रस्ट, अावास यांसह अन्य काही संस्था करतात. त्यांच्यापुढे माेठा प्रश्न अाहे ताे गायींच्या घशात वा पाेटात अडकून बसलेले ब्लेड, खिळे वा प्लास्टिकच्या पिशव्यांचा. रस्त्यावरील कचऱ्यात असलेल्या वस्तू हजाराे मुक्या प्राण्यांचे बळी घेत अाहेत. घशात किंवा पाेटात ब्लेड अाणि तत्सम वस्तू अडकल्याने त्यांना असह्य वेदना हाेतात. मुके प्राणी काेणत्याही मदतीशिवाय अशा वस्तू काढण्यास असमर्थ असतात. त्यामुळे त्यांचा मृत्यू संभवताे. 
 
हे करता येईल... 
वापरून झालेले ब्लेड कचऱ्यात टाकता डब्यात ठेवावे. वर्षभरानंतर हे जमा झालेले ब्लेड माेठा खड्डा करून त्यात बुजवावेत. खिळे, चुका अाणि तत्सम बाबींचेही असेच करावे. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या टाकण्याचीही काळजी घ्यावी. 
 
गायींच्या पाेटात वस्तू वा प्लास्टिक असल्याची लक्षणे 
- चारा खाता गायीचे पाेट फुगलेले दिसणे 
- गायीला १०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप असणे 
- गायीला धाप लागणे, लाळ गळणे, चारा खाणे. 
 
प्लास्टिक पिशव्यांमुळे चिंता... 
गायींना खाऊ घातल्यास पुण्य मिळते, या श्रद्धेपाेटी नागरिक गायींना अन्न खाऊ घालतात. हे अन्न प्लास्टिकच्या पिशव्यात अाणण्यात येत असल्यामुळे गायी अन्नासाेबत पिशव्याही खाऊन टाकतात. यामुळे गायींच्या पाेटात गाेळा साचून प्रसंगी गायीचा मृत्यू अाेढवू शकताे. 
 
अाम्ही याेग्यवेळी उपचार केल्याने गाय थाेडक्यात बचावली... 
काही दिवसांपूर्वीच अामच्या गाेशाळेतील एका गायीच्या पाेटातून डाॅक्टरांनी चक्क ब्लेड, खिळे तसेच चैन अशा वस्तू काढल्या. या वस्तूंमुळे गायीची तब्बेत खूपच खालावली हाेती. परंतु, याेग्यवेळी याेग्य उपचार झाल्यामुळे तिचे प्राण वाचू शकले. अलिकडे अशा घटना वाढल्या अाहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले अाहे. 
- पुरुषाेत्तम अाव्हाड, मंगलरूप गाेवत्स सेवा ट्रस्ट, नाशिक 
बातम्या आणखी आहेत...