आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाका विक्रेत्यांसाठी नियमांत यंदा अायुक्तांकडून शिथिलता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या फटाका विक्रेत्यांसाठी महापालिका अायुक्तांनी अगदी शेवटच्या क्षणी नियमांत शिथिलता केल्याने विक्रेत्यांना यंदाची दिवाळी साजरी करता अाली. पुढील वर्षापासून मात्र सर्वांना उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकाेरपणे पालन करावे लागणार अाहे. फटाका विक्रेत्यांवरील कारवाई टाळण्यासाठी अाजी माजी अामदारांनी महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांची रविवारी भेट घेतली हाेती. दरम्यान, फटाका स्टाॅलच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन विभागाने ५०० लिटरचे वाहने काढून त्या ठिकाणी १२ हजार लिटर क्षमतेचे बंब उभे केले. यावर डी. बी. स्टारच्या माध्यमातून प्रकाशझाेत टाकण्यात अाला हाेता.
अाैरंगाबाद येथे फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या अागीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राेहिदास बहिरम अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांनी शहरातील फटाका स्टाॅल्सला भेट देऊन पाहणी केली हाेती. या पाहणीत विक्रेत्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्टाॅल्सची उभारणी केली नसल्याचे निदर्शनास अाल्याने पालिकेने फटाका विक्रेत्यांना दुकाने हटविण्याबाबत नाेटीस बजावली हाेती. मात्र, पालिकेने लिलाव पद्धतीने गाळ्यांचे वाटप करून महसूल अाकारणी केल्याने विक्रेत्यांनी स्पष्ट नकार देत अधिकाऱ्यांशी वाद घातला हाेता. प्रारंभी शनिवारी रात्री वाजेपर्यंत रविवारी दुपारी वाजेपर्यंत दुकाने हटविण्याची मुदत देण्यात अाली हाेती. मात्र, एेन दिवाळीच्या दिवशीच हे करणे शक्य नसल्याने फटाका असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लाेकप्रतिनिधींना साेबत घेऊन पालिका अायुक्तांकडे जाण्याचा निर्णय घेतला हाेता. अामदार बाळासाहेब सानप माजी अामदार वसंत गिते यांच्यासाेबत असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अायुक्त कृष्णा यांची भेट घेऊन यंदाच्या वर्षासाठी नियमात शिथिलता करण्याची मागणी केली हाेती. अायुक्तांनी दाेन स्टाॅल्समध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंतर ठेवून फटाक्यांची विक्री करण्यासाठी परवानगी दिल्यानंतरा विक्रेत्यांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, बेकायदेशीररीत्या फटाक्यांची विक्री करणाऱ्या २४ विक्रेत्यांविरुद्ध विविध पाेलिस ठाण्यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात अाली अाहे.
दाेनफटाका गुदामांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू : पाेलीसांनीशहरातील चार फटाक्यांच्या गुदामांची तपासणी केली असता दाेन गुदामांत अनधिकृत साठा अाढळल्याने या गुदामांचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू केली अाहे.
फटाकाविक्रेत्यांनी केला दाेन स्टाॅल्समध्ये गॅप तयार : अायुक्तांनीनियमांत शिथिलता दर्शविल्याने फटाका विक्रेत्यांनी तातडीने दाेन स्टाॅल्समध्ये सुमारे पाच फुटांपर्यंतचे अंतर ठेवले. काही ठिकाणी दाेन स्टाॅल्सधारकांनी दाेन्ही बाजूंचा माल बाजूला सारून माेकळीक तयार केली.
फटाका विक्रेत्यांनी अामदार बाळासाहेब सानप माजी अामदार वसंत गिते यांच्यासमवेत चर्चा केली त्यानंतर पालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली.
या पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतील विक्रेत्यांवर झाली कारवाई
अंबड: १० केसेस
सातपूर : ०२ केसेस
उपनगर : ०४ केसेस
नाशिकराेड : ०२ केसेस
देवळाली कॅम्प : ०२ केसेस
सरकारवाडा : ०२ केसेस
भद्रकाली : ०२ केसेस
एकूण: २४ केसेस

स्टाॅल्सच्या सुरक्षिततेसाठी १२ हजार लिटरचे बंब
फटाका दुकानांच्या सुरक्षिततेसाठी १२ हजार लिटर क्षमतेचा बंब ठेवणे अावश्यक असतानाही अग्निशमन विभागाने मात्र ईदगाह मैदान डोंगरे वसतिगृह मैदानांवरील फटाका स्टाॅल्सच्या सुरक्षिततेसाठी फक्त ५०० लिटर क्षमतेचे बंब ठेवले हाेते. रविवारी डी. बी. स्टारच्या माध्यमातून यावर प्रकाशझाेत टाकल्यानंतर या दाेन्ही ठिकाणी दुपारनंतर १२ हजार लिटर पाण्याची क्षमता असलेले बंब उभे करण्यात अाले हाेते.
बातम्या आणखी आहेत...