आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाकेविराेध; शिवसेना-भाजपत तडतडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पवननगर येथील फटाके स्टाॅलला भाजपच्या एका अामदाराचा विराेध, तर दुसऱ्याचे समर्थन कसे हाेते वर्षानुवर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या फटाके विक्रेत्यांचे त्यात कसे मरण हाेते, याकडे शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी लक्ष वेधल्यावर त्यास अाक्षेप घेत भाजपचे माजी गटनेते संभाजी माेरुस्कर यांनी अाक्षेप घेतल्यावर उभयतांत चांगलीच शाब्दिक तडतडी उडाली. अखेर पेटलेल्या या तडतडीला विझवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांना मध्यस्थी करावी लागली.
राेबाेटिक यंत्रणेवरून महासभेत जाेरदार गदाराेळ सुरू असताना बडगुजर यांनीही माईक हाती घेतला. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी महापाैरांची परवानगी असेल तर दाेन मिनिट विषयांतर हाेईल, मात्र गंभीर विषयाकडे लक्ष वेधू का, अशी विनंती केली. महापाैरांनी परवानगी दिल्यावर बडगुजर यांनी पवननगर येथील फटाकेविक्रीच्या स्टाॅलधारकांची दाेन अामदारांच्या वादात कशी अडवणूक हाेते, याकडे लक्ष वेधले. येथील फटाके स्टाॅलला परवानगी देऊ नका, असे पत्र अामदार अपूर्व हिरे यांनी दिले, तर सिडकाे मतदारसंघातील भाजप अामदार सीमा हिरे यांनी सहमती दाखवली. मात्र, महापालिका अपूर्व हिरे यांच्या पत्रानुसार परवानगी नाकारत असून, वर्षानुवर्षांपासून याच जागेवर व्यवसाय करणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर अन्याय हाेत असल्याचा अाराेप बडगुजर यांनी केला. दरम्यान, भाजप अामदारांची बदनामी हाेत असल्याचे बघत अचानक माेरुस्कर अाक्रमक झाले. राेबाेटिकचा विषय असताना फटाके काेठून अाले, असा सवाल करीत महापाैरांना विषयांतराबाबत प्रश्न केला. त्यावर बडगुजर अाक्रमक झाले. महापाैरांची परवानगी घेऊन विषय उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर माेरुस्कर यांनी अापला महापाैरांनाच प्रश्न असल्याचे सांगत विषयांतराचा पॅटर्न का, असाही सवाल केला. भाजप अामदारांच्या बदनामीचे काय, असाही प्रश्न केल्यावर बडगुजर यांनी अापल्याकडे पुरावे असून, त्याशिवाय बाेलत नसल्याचे सांगितले. शिवसेना भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांचा वाद चिघळल्याचे बघून माेरुस्कर यांच्या शेजारी बसलेले सानप यांनी अखेर वादावर पडदा टाकला.

महापालिका निवडणुकीचे पडघम
महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता अाणण्यासाठी शिवसेना भाजप या दाेघांमध्ये जाेरदार संघर्ष सुरू अाहे. प्रारूप प्रभागरचना अारक्षण साेडतीनंतर अाता दाेन्ही पक्ष युद्धपातळीवर तयारीला लागले अाहेत. दरम्यान, एकमेकांवर कुरघाेडी करण्याचे प्रयत्नही लपून राहिलेले नाही. महासभेत त्याची प्रचिती अाल्यामुळे येत्या काळात उभयतांमध्ये संघर्ष रंगल्यास नवल वाटणार नाही.
बातम्या आणखी आहेत...