नाशिक - सरस्वतीनगर येथील क. का. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय तसेच कृषी महाविद्यालयात ट्रेडिशनल डे आणि रोझ-डे रंगला. रोझ-डेच्या निमित्ताने अनेकांनी
आपल्या मनातील गुपितं उलगडण्याची संधी साधली, याला पारंपरिक पेहरावाची जोडही होती. याचबरोबर शिवाजी महाराज, खंडोबा, म्हाळसा बानू यांसारख्या वेशभूषादेखील केल्या होत्या.
याचबरोबर बीवायके महाविद्यालयामध्ये चॉकलेट डे आणि बॉलीवूड डे साजरा करण्यात आला. हेराफेरीतील बाबूराव श्याम आणि राजू फटफटी घेऊन फिरत होते. याच्याच जोडीला चॉकलेट-डे ला कुछ मिठा हो जाए हेच वातावरण दिसत होते.