आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहन ताेडफाेडीतील अाराेपी अद्याप फरारच, सातपूर परिसरात नागरिकांमध्ये भीती कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सातपूर काॅलनी परिसरात दहशत माजवून ११ वाहनांची ताेडफाेड केलेले संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असले तरी त्यांच्यापर्यंत पाेलिसांना पाेहोचण्यात अद्याप यश अालेले नाही. या घटनेमुळे नागरिकांच्या मनातील भीती कायम असून, वाढती गुन्हेगारी राेखण्यासाठी स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी पाेलिस अायुक्तांना निवेदन सादर केले अाहे.

बुधवारी रात्री जुन्या सातपूर काॅलनीपासून अानंदछाया नीलधारा साेसायटीपर्यंत गुन्हेगारांनी धिंगाणा घालत वाहनांच्या काचा फाेडून नुकसान केले हाेते. सातपूरमध्ये प्रथमच घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अाहे. मनसेच्या तिकिटावर निवडून अालेल्या, मात्र सध्या पक्षांतर केलेल्या नगरसेविका उषा शेळके यांचे पुत्र धीरज यांच्यावर नुकताच भद्रकाली पाेलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला अाहे. या घटनेकडील लक्ष विचलित करण्यासाठीच हे समाजविराेधी कृत्य केल्याची चर्चा सातपूर परिसरात अाहे. मात्र, पाेलिसांनी याबाबत माहिती देण्यास नकार देत अामचा तपास याेग्य िदशेने दृष्टीने सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, यासंदर्भात सलीम शेख यांनी पाेलिस अायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले अाहे की, सातपूर काॅलनी परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले अाहे. काही दिवसांपूर्वीच समतानगर, अाठ हजार गाळेधारक वसाहत, जुनी सातपूर काॅलनी या भागातील ८-१० ठिकाणी घरफाेडीच्या घटना घडल्या अाहेत. गुन्हेगारांवर पाेलिसांचा वचक नसल्यानेच वाहन ताेडफाेडीची घटना घडली. हा प्रकार म्हणजे दहशत माजवितानाच थेट पाेलिस यंत्रणेला अाव्हान अाहे. यामागे काही राजकीय षडयंत्र असल्याचा संशय असून, या समाजकंटकांविरुद्ध कठाेर कारवाई करावी. पाेलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात साेपान शहाणे, प्रकाश निगळ, मनाेज महांगडे, निकेश भंगाळे, दिलीप जैन, मार्काेस मथायस, सचिन सिन्हा, गजानन गाेहील, राजू पाटील, विनाेद अाहिरे, विजय उल्हारे, एजाज शेख, गाैरव अाहेर, सदाशिव साळवे अादींचा समावेश हाेता.
बातम्या आणखी आहेत...