आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञाननिर्मितीची अनोखी "शैक्षणिक जत्रा', इस्पॅलियर स्कूलमध्ये अनोखा उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थ्यांचासर्वांगीण विकास व्हावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने स्नेहसंमेलनाऐवजी त्यांना ज्ञाननिर्मितीचा मंत्र इस्पॅलियर शाळा शनिवारपासून सुरू होणाऱ्या "शैक्षणिक जत्रा' या दोनदिवसीय उपक्रमातून देणार आहे.
उपक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अाठ विषयांवरील पोस्टर्स मॉडेल्सचा समावेश आहे. त्यात जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन, भारत देश, प्राणी संस्कृती, ऊर्जास्त्रोत, नैसर्गिक साधन संपत्ती, आपली साहित्य संस्कृती विषयांचा समावेश आहे. या विषयांवर आधारित ३७० विद्यार्थ्यांनी सुमारे ४०० पोस्टर्स काही मॉडेल्स बनविले आहेत. विद्यार्थ्यांच्या या कलाकृती सकाळी ९.३० ते या वेळात सर्वांना बघण्यासाठी खुल्या राहणार आहेत.
वेळ वाया घालवता विद्यार्थ्यांनीच बनविलेल्या शिक्षण साहित्याचा उपयोग त्यांच्या शिक्षणासाठी केला जाणार आहे. शहरातील हा पहिलाच प्रयोग आहे. शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांनीच बनविलेले असेल, तर त्याचा उपयोग विषयाचे मूळ गाठण्यासाठी होतो. हाच उद्देश लक्षात घेऊन हा उपक्रम होत असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने, तसेच पालकांनीही या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.