आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपाट नियमित करण्यासाठी लहान रस्ते करणार माेठे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नऊ मीटर खालील रस्त्यांना टीडीअार अनुज्ञेय नसताना मात्र याच रस्त्याखाली बहुतांश इमारतीत कपाट क्षेत्राशी संबंधित प्रकरणे नियमितीकरणाचा भिजत पडलेला विषय मार्गी लावण्यासाठी अाता सहा साडेसात मीटरचे रस्ते दाेन्ही बाजूने विस्तारित करून त्यानंतर नऊ मीटर पुढे रस्ता झाल्याचे दाखवायचे त्यानंतर वाढीव एफएसअाय घेऊन कपाटाशी संबंधित प्रकरणे मंजूर करायचे असा ताेडगा क्रेडाईसह विविध बांधकाम व्यावसायिक संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत निघाला अाहे. क्रेडाईने अधिकृत प्रेस नाेटद्वारेच त्याबाबत माहिती दिली. 
 
गेल्या तीन वर्षांपासून शहरातील जवळपास पाच ते सहा हजार इमारतीतील कपाट क्षेत्राशी संबंधित प्रकरणांचा विषय गहन झाला अाहे. कपाट क्षेत्राच्या नियमितीकरणासाठी विकसकांनी तगादा लावला असून, एफएसअायचे उल्लंघन झाल्यामुळे अशी प्रकरणे मंजूर करता येणार नाही अशी महापालिकेची भूमिका हाेती. अखेर हे प्रकरण राज्य शासनाकडे पाठवण्यात अाले. मात्र, तेथेही ताेडगा निघाला नव्हता. दरम्यान, नवीन विकास नियंत्रण प्राेत्साहन नियमावलीत याप्रकरणी दिलासा मिळेल अशी अपेक्षा हाेती. प्रत्यक्षात नवीन विकास नियंत्रण नियमावलीतही नऊ मीटरखालील रस्त्यासन्मुख मिळकतींना टीडीअार लागू करण्याचा निर्णय कायम ठेवला गेला. त्याबराेबरच फंजिबल वा पेड एफएसअायच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची वाटही बंद झाली. त्यामुळे धास्तावलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी भाजपचे अामदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, अपूर्व हिरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित हाेते. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेत असल्याची घाेषणा केल्यामुळे बांधकाम व्यवसायाच्या अनुषंगाने विकासाचा संबंध लक्षात घेत याप्रकरणी मार्ग काढण्याची विनंती सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान नऊ मीटरखालील रस्त्यांवरील इमारतींना वाढीव एफएसअाय देण्यासाठी साडेसहा सात मीटरचे रस्ते दुतर्फा विस्तारित केले जाणार अाहे. जेणेकरून नऊ मीटर रस्ता झाल्यास वाढीव एफएसअाय मिळू शकेल. असा एफएसअाय मिळाल्यावर कपाटाचे प्रकरण मार्गी लागतील. याबराेबरच पुणे नाशिक डीसीपीअारचे नियमसारखे करावे. फ्रंट साइड मर्जिनबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, पाेडियमवर ५० टक्के अाेपन स्पेस ग्राह्य धरणे, बाल्कनीचा विषय मार्गी लावणे, फेब्रुवारीपूर्वी नगररचना विभागात परवानगीसाठी दाखल प्रकरणांना जुन्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार मंजूर करणे अशा मागण्या करण्यात अाल्या त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकरित्या साेडवण्याचे अाश्वासन दिल्याचे क्रेडाईने स्पष्ट केले. 

गावठाणात एफएसअायसाठी प्रयत्न 
अामदार देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य मतदारसंघातील गावठाणाच्या दुतर्फा असलेल्या मिळकतींच्या नूतनीकरणासाठी एफएसअाय देण्याची गरज बाेलून दाखवली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय हाेईल असे संकेत दिले. यावेळी नगररचना विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, अायुक्त अभिषेक कृष्णा, सहायक संचालक अाकाश बागुल यांच्यासह बांधकाम अार्किटेक्ट असाेसिएशनचे पदाधिकारी उपस्थित हाेते. 

अाग रामेश्वरी अाणि बंब..... 
साडेसहासात मीटर रस्त्यावरील बहुतांश इमारती जुन्या अाहेत. रस्त्याला अगदी खेटून म्हणजेच अनेक ठिकाणी सामासिक अंतराचे काही ठिकाणी उल्लंघन झालेले अाहेत. त्यातही सर्वच ठिकाणी रस्ता विस्तारीकरणासाठी जागा अाहेच असे नाही. काही ठिकाणी इमारती तर काही ठिकाणी माेकळ्या जागा अाहेत. माेकळ्या जागेवरील मालक रस्ता विस्तारीकरणासाठी जागा देतीलच असे नाही. त्यामुळे रस्ते विस्तारीकरण करून प्रश्न साेडवण्याची बाब प्रत्यक्षात येईलच याविषयी खुद्द बांधकाम व्यावसायिकच साशंक अाहे. तूर्तास काही ठिकाणी कपाटाचे अाठ बाय दहाचे क्षेत्र नियमित करण्याच्या नादात रस्त्यालगतची इमारत पाडण्याची वेळ येते काय, असा प्रश्न केला जात अाहे. ‘अाग रामेश्वरी बंब साेमेेश्वरी’ याप्रमाणे तर हाेणार नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात अाहे. 

 
बातम्या आणखी आहेत...