आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘क्रेडाई’कडून वृक्ष जतनासाठी ४३ एकर क्षेत्राला कुंपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी (दि. ५) सातपूर परिसरातील शिवाजीनगराशेजारील फाशीचा डोंगर येथे ‘आपलं पर्यावरण’ आणि वन विभाग, नाशिक यांच्या वतीने वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १० हजार वृक्ष लोकसहभागातून लावण्यात येणार आहेत. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेली ‘क्रेडाई’ या वृक्षांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे ठरणार असलेले चॅनलिंग कुंपण करीत आहे.

४३ एकर क्षेत्राला केल्या जाणाऱ्या या कुंपणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. विपश्यना केंद्राच्या वतीने तीन इंची जलवाहिनी येथे टाकून तिच्या देखभालीची जबाबदारी उचलण्यात आली आहे. ‘हरित नाशिक’ घडविण्याकरिता, आहे ते जोपासण्याकरिता ‘क्रेडाई’चे हे काम दीर्घकालीन फायद्याचे ठरणार आहे.
शहरापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावरील फाशीच्या डोंगरावर वृक्षलागवड करून त्याची तीन वर्षे देखभाल करण्यात येणार आहे. निसर्गप्रेमी आणि आपलं पर्यावरण ग्रुपचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी यासाठी मेहनत घेतली. या उपक्रमात प्रत्येकाने आपल्या हक्काचे एक झाड लावावे. त्यासाठी केवळ सोबत पाच लिटर पाणी द्यायचे आहे.
शहरवासीयांनी सहभागी व्हावे...
फाशीच्याडोंगरावर दहा हजार रोपांची लागवड करण्यात येणार अाहे. यासाठी वनविभाग, क्रेडाई या संस्थांनी मदत केली असून शहरातील पर्यावरणप्रेमींनी मदत केली आहे. त्यामुळे पर्यावरण दिनाच्या दिवशी सर्व शहरवासीयांनी आपला घरातील सोहळा समजून पर्यावरण संवर्धनासाठी सहभागी व्हावे.
-शेखर गायकवाड, अध्यक्ष, आपलं पर्यावरण ग्रुप