आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Credit Capital Co Operative Bank Bogus Loan Issue Nashik

.. तर कर्जदारांची नावे छायाचित्रासह प्रसिद्ध करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - थकबाकीदार कर्जदारांचे छायाचित्रांसह नाव तसेच त्यांच्या जामिनदारांचे नाव वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्याच्या मुद्यावर जिल्हा सहकार कृती समितीच्या बैठकीत चर्चा झाली. स्टेट बँक अशा पद्धतीने कर्जदारांचे नाव प्रसिद्ध करत असल्याने त्याप्रकारे निर्णय घेण्याचे ठरले.

समितीची बैठक प्रथम जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत व नंतर जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अल्प वेळ झाली. बैठकीत केवळ चर्चाच झाली. निर्णयांची ठोस अंमलबजावणी जर होत नसेल तर बैठकीचा उपयोग काय, अशी स्पष्ट भूमिका अशासकीय सदस्यांनी मांडली. तातडीची काही शासकीय कामे असल्याने ही बैठक तहकूब करून या महिन्यातच पुनश्च घेण्याचे निश्चित करण्यात आले. अल्पवेळ झालेल्या या बैठकीत अग्रसेन पतसंस्थेतील 30 फाइली गहाळ असल्याचे सांगण्यात आले.

क्रेडिट कॅपिटल पतसंस्थेतील बोगस कर्जवाटप या विषयांसह कपालेश्वर पतसंस्था ठेवी वाटपाबाबत काय करणे शक्य आहे, यावर चर्चा झाली. चर्चेत अशासकीय सदस्य पां. भा. करंजकर, बी. डी. घन, ठेवीदार संघटनेचे डॉ. डी. एल. कराड, पाटील व जिल्हा उपनिबंधक बनसोडे आदींसह पतसंस्था व बँक व्यवस्थापकांनी भाग घेतला.