आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटमध्ये राष्ट्रवादीचा ‘पाॅवर’प्ले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राजकारणाइतका क्रिकेटच्या मैदानातही दबदबा टिकवून ठेवणाऱ्या शरद पवार यांचे नाशिकमधील अनुयायी सध्या राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी अचानक घेतलेल्या ‘पाॅवर प्ले’मुळे चक्रावून गेले अाहेत. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवरील सर्वेसर्वा छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत जिल्हा क्रिकेट असाेसिएशनच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या उपस्थितीत हा धक्का िदल्यामुळे खेळीमागे नेमके काेण, असाही प्रश्न निर्माण झाला अाहे. खुद्द पगार यांच्या खांद्यावर कप्तानपद वा अन्य काेणतीही थेट जबाबदारी नसली तरी, त्यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल असा समज पसरल्यामुळे तूर्तास याच मैदानातील पवार समर्थक ‘खेळाडू’ पुरते संभ्रमात पडले अाहेत.
राजकीय अाखाड्यातील अत्यंत बाहुबली पहिलवान म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या पवार यांच्या राष्ट्रवादीची चर्चा राजकारणानंतर क्रिकेटशी निगडित विषयावरून अधिक हाेते हे सर्वश्रृत अाहे. अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे क्रीडा मंत्रालय नसले तरी, मुंबई क्रिकेट असाेसिएशनच्या माध्यमातून त्यांचा जागतिक पातळीवरील दबाव प्रभाव कायमच चर्चेचा विषय ठरला अाहे. पक्षाच्या अध्यक्षांचा क्रिकेटमधील बॅटिंगचा माेह राष्ट्रवादीच्या तळागाळातील पदाधिकारी वा कार्यकर्त्यांना पडला असेल तर नवल वाटू नये. त्यातून राजकारणापेक्षा क्रिकेटसारख्या क्षेत्रात करिअर करण्याची चांगली संधी असल्याचा ग्रह हाेऊन त्यातून काेणी क्रिकेट असाेसिएशनच्या निवडणुकीत ‘पॅड’ बांधून उभे ठाकले, तर त्यातही गैर नाही. मात्र, जेव्हा स्वकियांशीच लढाईची वेळ येते खासकरून पक्षाच्या नेत्यांशी संबंधित ‘खेळाडूंनाच’ क्लीन बाेल्ड करण्यासाठी बाह्या सरसावल्या जातात, तेव्हा मात्र असे सामने निश्चितच अाकर्षणाचा विषय ठरतात. त्याचीच प्रचिती जिल्हा क्रिकेट
असाेसिएशनच्या निवडणुकीच्यानिमित्ताने येत असून, या सामन्यात विद्यमान अध्यक्ष विनाेद शहा यांच्या ‘खेळाडू’ या पॅनलची गाठ अाता क्रिकेटच्या अाखाड्यात कसलेल्या निवडणुकीत प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या मकरंद अाेक यांच्या परिवर्तन पॅनलशी अाहे.
तसे पाहिले तर शहा अाेक यांच्यातील लढाई पारंपरिक असली तरी, यंदाच्या निवडणुकीत पुन्हा जिल्हाध्यक्ष पगार यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादीचे वलय प्राप्त झाले अाहे. यापूर्वी २००९ मध्ये छगन भुजबळ यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप खैरे सचिन महाजन यांनी संघाची जमवाजमव केली हाेती. २०१२ मध्ये सामंजस्याने हे दाेन्ही भुजबळ समर्थक निवडणुकीतून बाहेर पडले.

मात्र, महेश भामरे यांच्या रूपाने राष्ट्रवादीशी संबंधित पदाधिकाऱ्याकडून अाव्हान कायम अाहे. या दाेन निवडणुकीत राष्ट्रवादीसंबंधित काेणत्याही पदाधिकाऱ्याने थेट ‘रस’ घेणे टाळले हाेते. मात्र, पगार यांनी भामरे यांच्या अर्ज दाखल करण्याच्यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून उपस्थिती लावल्यामुळे अाता पक्षाशी संबंधित पॅनल असा समज पसरू लागला अाहे.
पवार-भुजबळ अनुयायांचा सामना चर्चेचा विषय

खेळाडूपॅनलमधील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा जाहीरपणे काेणत्याही पक्षाशी संबंध नसला तरी, खासकरून पवार त्या अनुषंगाने राष्ट्रवादीशी असलेली त्यांची जवळीकही सर्वश्रृत अाहे. अशा परिस्थितीत थेट पक्षाचा संबंध नसला तरी, अाेघानेच पवार भुजबळ यांच्या अनुयायांचा सामना चर्चेचा विषय ठरला अाहे.

क्रिकेटच्या मैदानावर प्रशासकीय वर्चस्व राखण्यासाठी होणाऱ्या लढतीत कोण कोणाची विकेट घेणार? हे पाहणेच आता औत्सुक्याचे ठरले.