आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime At Nashik, Police Arrested To Company Mangaer

भुवनेश्वरचा भामटा नाशकात जेरबंद; पोर्न नटीवर उधळले 2 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ओडिशातील भुवनेश्वर येथे गुंतवणूकदारांना तब्बल २०० कोटींचा गंडा घालणाऱ्या एक कंपनीच्या महाव्यवस्थापकाला नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने आडगाव परिसरातील एका पॉश गृहप्रकल्पातून जेरंबद केले. सात महिन्यांपासून भुवनेश्वर पोलिसांत वाँटेड असलेल्या या संशयिताचा ताबा शनिवारी भुवनेश्वर पोलिसांनी घेतला आहे.

ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे ट्रेसी सिक्युअर लिमिटेड या कंपनीचा महाव्यवस्थापक दयानिधी मोहपात्रा (रा. भद्रक) याने गुंतवणूकदारांना १ लाख रुपये गुंतवणूक केल्यास दरमहा अडीच हजार रुपये आणि एक वर्षाने दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत हजारो गुंतवणूकदारांना सुमारे २०० कोटींचा गंडा घातला आहे.

पोर्न अभिनेत्रीवर उधळले २ कोटी
एका पोर्न अभिनेत्रीच्या एक तासाच्या नृत्याकरिता मोहपात्राने तब्बल २ कोटी रुपये उधळल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. हे ऐकून अधिकारीही अवाक् झाले. सात महिन्यांत थायलंड, मलेशिया, बँकॉक आणि पट्टाया येथे फिरून आल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.