आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी अाली नियंत्रणात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. बहुतांशी गुन्ह्यांत ‘भाईं’वर कारवाई करण्यात आली असून, त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. आता पोलिसांचे पुढील लक्ष्य ‘भाईं’चे समर्थक राहाणार अाहे.
शहरात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे पोलिस दलावर सर्वत्र टीकेची झोड उडत असताना पालकमंत्री गिरीश महाजन, पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी आयुक्तांना अल्टिमेटम दिला होता. या अल्टिमेटमचे आव्हान पेलत पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी गुन्हेगारीच्या विरोधात रणशिंग फुकले. पोलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासारख्या धडाकेबाज अधिकाऱ्यांची साथ लाभल्याने शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांची जरब बसण्यास सुरुवात झाली.

गुन्हेगारांना त्यांच्याच परिसरात फिरवत त्यांना खजील करण्याचे तंत्र वापरले जाऊ लागल्याने या ‘भाईं’ची सर्वसामान्य नागरिकांवर असलेली मर्दुमकीची इभ्रत भरवस्तीमध्ये चव्हाट्यावर काढली जाऊ लागल्याने अनेक ‘भाईं’नी पोलिसांपुढे शरणागती पत्करणे पसंत केले. गंभीर गुन्ह्यात ‘भाईं’वर मोक्का, एमपीआडी अतंर्गत कारवाई करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. मात्र, तरीही या ‘भाईं’च्या कच्चा बच्चांकडून परिसरात भाईगिरी सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. पोलिसांनी ‘भाईं’च्या समर्थकांवर वक्रदृष्टी फिरवली असून, आता पोलिसांचे पुढील लक्ष समर्थक राहणार असल्याने ‘भाई’प्रमाणे समर्थकांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.

गुन्ह्यांची संख्या घटली
परिमंडळ मध्ये १३ पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत पंधरा दिवसांत अवघे १०५ गुन्हे दाखल असल्याची नोंद दैनंदिन गुन्हे अहवालात आहे. अपघात, ४९८ आणि वाहन चोरीसह किरकोळ चोरीच्या गुन्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे.

कारवाई सुरूच राहणार
^गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कारवाई सुरूच राहणार आहे. सराईत गुन्हेगार कारागृहात आहेत. मात्र, समर्थकांकडून गुन्हे घडवण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. या गुन्हेगारांना ‘अर्थ’साह्य आणि मदत करणाऱ्यांसह समर्थकांवर कारवाई केली जाणार आहे. -लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ
बातम्या आणखी आहेत...