आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दरोड्याच्यातयारीतील तीन सराईत गुन्हेगारांना पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शाेध पथकाने मीनाताई ठाकरे स्टेडियमनजीक सोमवारी मध्यरात्री अटक केली.
चौकशीत उद्धव भिकन कासार (रा. वज्रेश्वरी), भिका बाळू गवे (रा. नवनाथनगर), प्रल्हाद भीमा शिंदे (रा. मायको दवाखाना) अशी त्यांनी नावे सांगितली. त्यांच्या झडतीत तलवार, चाकू, लाकडी दांडा, मिरची पूड दोरी सापडली. संशयितांकडून तलवार, प्राणघातक हत्यारे आणि मिरची पूड हस्तगत करण्यात आली आहे. पाचपैकी दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले अाहेत.