आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या गुन्हेगारीसंंदर्भात पोलिस आयुक्त धारेवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाढते गुन्हे, दिवसा घरफोडीचे प्रकार रोखण्यास पोलिसांना अपयश येत असल्यामुळे आमदार बाळासाहेब सानप यांनी पोलिस आयुक्तांसह अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून धारेवर धरले. गुन्हेगारीचा आढावा घेऊन गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही केली. गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची संख्या कमी पडत असल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे अाश्वासनही आयुक्तांना दिले.
कृष्णनगर परिसरातील धाडसी घरफोडीचा प्रकार गांभीर्याने घेत सानप यांनी आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी बोलावले. आमदार निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केले. शहरात सक्रिय झालेल्या टोळ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी, जरब म्हणून परिसरात गस्त वाढविण्याच्या सूचना केल्या. गुन्हेगारी रोखण्यासाठी कारवाई सुरू आहे. सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. काही सराईत गुन्हेगारांचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले. कोठे अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. सहायक आयुक्त सचिन गोरे, विभाग दोेनचे राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे अादी उपस्थित होते.

मनुष्यबळासाठी पाठपुरावा
^शहरातील गुन्हे रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. पोलिस संख्या कमी असल्याने वाढीव मनुष्यबळासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सहकार्य राहीलच. बाळासाहेबसानप, आमदार

सायकल गस्त ठरली फार्स
पोलिसांनी सायकल गस्त सुरू केली. मात्र, एक दिवस ‘फोटो सेशन’ केल्यानंतर अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी सायकल गस्तीची ‘हवा’ काढून घेतल्याने सायकल गस्त फार्स ठरली आहे.