आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक क्राईम: सव्वादोन लाख लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शरणपूररोड परिसरात दुचाकीच्या डिक्कीतून सव्वादोन लाख रुपये लांबवल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. राजेश देवीप्रसाद शुक्ला यांनी शरणपूररोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रमधून ही रक्कम काढून दुचाकी (एमएच 15, डीएच 4371)च्या डिक्कीत ठेवली. मित्रासोबत गप्पा मारून निघताना बनावट चावीने डिक्की उघडून चोरट्यांनी रोकड लांबवल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माजी नगरसेविकेच्या पतीवर चाकूहल्ला
सिडको- माजी नगरसेविका शीला भागवत यांचे पती तुळशिराम भागवत भांडण सोडवायला गेले असता त्यांच्याच हातावर चाकूने वार करण्यात आल्याची तक्रार भागवत यांनी चेतन चव्हाण व राहुल वरखेडे (रा. राजरत्ननगर) यांच्याविरुद्ध दिली. भागवत हे त्यांचे मित्र प्रवीण सोनवणे यांच्या घरात बसले असताना आरोपींनी मित्राला बाहेर बोलावून मागील कुरापत काढून मारहाण केल्याची आणि त्यांना सोडवण्यासाठी गेले असता यांच्याही हातावर चाकूने वार केल्याची भागवत यांनी तक्रार दिली आहे, तर राहुल वरखेडे यांनीही फिर्याद दिली. अंबड पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले.

युवतीवर ब्लेडने वार
पंचशीलनगरमधील अल्पवयीन युवतीवर संशयित सूरज सीताराम शेवरे याने एकतर्फी प्रेमातून व संबंधित युवतीने त्यास नकार दिल्याने त्याने या युवतीच्या हातावर ब्लेडने वार करून जखमी केले. युवतीच्या पालकांनी भद्रकाली पोलिसांत फिर्याद दिली