आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस महासंचालकांचे अायुक्तांना अादेश- गुन्हेगारी नियंत्रणासाठी दहा दिवसांत करा ठाेस उपाययाेजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील वाढती गुन्हेगारी राेखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकस्नेही उपक्रमांबराेबरच प्रतिसाद अॅप आणि पोलिस मित्र संकल्पना दहा दिवसांत राबवून कामकाजात सुधारणा करावी, असे अादेश पाेलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मंगळवारी दिले. दाेन दिवसांपासून नाशिक दाैऱ्यावर अालेल्या दीक्षित यांनी शहरातील खून, दराेड्याच्या वाढत्या घटनांवर उघडपणे नाराजी व्यक्त करीत पालकमंत्र्यांपाठाेपाठ त्यांनीही यंत्रणेला अधिक सतर्क करण्याच्या सूचना दिल्या अाहेत.

पाेलिस अायुक्तालयात मंगळवारी (दि. ७)महासंचालकांनी अधिकाऱ्यांकडून गुन्हेगारीचा अाढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. गुन्हेगारी राेखण्यासाठी अधिक पाेलिसिंगबराेबरच माेबाइल इंटरनेटमार्फतही तक्रारी घेण्यासाठी सुरू केलेल्या विविध अॅपची दीक्षित यांनी माहिती दिली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘प्रतिसाद’ अॅप सुरू केले आहे. या अॅपद्वारे अथवा थेट पाेलिसांकडेही महिलांनी मदत मागितल्यास चोवीस तासांच्या आत संशयितांवर कारवाई केली जात अाहे. वाहनचोरीच्या घटना रोखण्यासाठीही स्वतंत्र अॅप सुरू केले अाहे. या अॅपवर तक्रार दिल्यास दहा दिवसांत चोरी गेलेली वाहने परत मिळू शकतील. यापाठाेपाठ पोलिस मित्र अॅपचा नागरिकांनी फायदा घ्यावा, असे अावाहन त्यांनी केले. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातही गुन्हे रोखण्यासाठी पोलिस मित्र म्हणून काम करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे अावाहन दीक्षित यांनी केले. महासंचालक कार्यालयाने सुरू केलेल्या याेजना संबंधित अॅप्सची माहिती नागरिकांपर्यंत पाेहोचण्याचे अादेश अायुक्तांना दिले. यासाठी दहा दिवसांची मुदत देत त्यानंतर संबंधितांवर कारवाईचे सूताेवाचही त्यांनी केले. पत्रकारांनी प्रश्न उपस्थित करताच यावर अायुक्तांकडूनच माहिती घेण्याचा सूचक सल्लाही त्यांनी दिला.

पाचवर्षांपासूनच्या गुन्ह्यांचा अभ्यास : पोलिसदलाची प्रतिमा सुधारण्यासाठी शहरातील गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांशी संवाद साधावा. पाेलिस मित्र संकल्पनेची अंमलबजावणी करण्यावर भर देतानाच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातील अाराेपी तपासावेत. त्याचबराेबर त्यांच्यात पूर्ववैमनस्यातून घडलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास करून त्यांच्याकडून ‘बदला’ घेण्याच्या भावनेतून काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेण्याच्याही सूचना दीक्षित यांनी केल्या.

शहरामध्ये गुन्ह्यात अल्पशी वाढ; पाेलिस अायुक्तांचा दावा
गुन्हेगारी रोखण्यास पोलिस यंत्रणेला अपयश येत असल्याची लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून टीका होत असताना मात्र महासंचालकांनी घेतलेल्या अाढाव्यात अायुक्त एस. जगन्नाथन यांनी गतवर्षीच्या तुलनेत केवळ एक टक्काच गुन्हे वाढल्याचा दावा केला. खुनाचा एक गुन्हा वगळता घरफोडी, चोरी, वाहनचोरी आणि अन्य गुन्हे मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहेत. खुनाच्या घटनांपैकी पंचवटीतील एक खुनाची घटना वगळता इतर सर्व गुन्हे एकमेकांशी संबंधातून झाले असल्याचेही त्यांनी सांगत शहरात सर्व काही अालबेल असल्याचे चित्र निर्माण केले.

या विषयांवर झाली चर्चा
शहरातीलप्रमुख मार्गांवर चाेवीस तास नाकेबंदी, संशयितांची अाधारकार्डद्वारे माहिती जतन करणे, मद्यपी टवाळखाेरांवर नियमित कारवाई, शहरांतर्गत रस्ते अपघात रोखण्यासाठी विशेष नियोजन, सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर, महिला सुरक्षिततेबाबत गांभीर्यता या विषयांवर सखाेल चर्चा झाली. माेक्कांतर्गत कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीकडून भेळविक्रेत्याचा खून झाल्याच्या घटनेने पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना यावर सकारात्मक उत्तर देता आले नसल्याने महासंचालकांनी आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेतल्याचे वृत्त अाहे.
बातम्या आणखी आहेत...