आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime New In Marathi, Agent Tray To Kill St Driver

एसटीच्या बसचालकास ट्रॅव्हल एजंट‌ची मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रवासीपळवणाऱ्या एजंटांना बसचालकाने हटकल्याचा राग आल्याने पाच ते सहा तरुणांच्या टोळक्याने चालकास मारहाण करत पोटावर चाकू लावत जिवे मारण्याची धमकी दिली. रविवारी (दि. ९) सकाळी १०.३० वाजता बसस्थानकावर हा गंभीर प्रकार घडला. सरकारवाडा पोलिसांत याबाबत तक्रार देण्यात आली आहे.
नवीन सीबीएस स्थानकात खासगी ट्रॅव्हल एजंटांचा सुळसुळाट झाला असून, आता तर त्यांची मजल बसचालकांना मारहाण करण्यापर्यंत गेली आहे. रविवारी सकाळी जालना आगाराचे चालक एस. जी. नेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ड्यूटी संपवून ते विश्रांती कक्षाकडे जात असताना स्थानकात दोन ते तीन तरुण पुणे, औरंगाबाद, मुंबई असे ओरडून प्रवाशांची दिशाभूल करत होते. नेरकर यांनी या तरुणांना मज्जाव करताच त्याचा राग आल्याने या तरुणांनी त्यांना मारहाण केली. त्यांचे इतर साथीदारही जमा झाले. यातील एकाने धारदार चाकू काढून नेरकर यांच्या पोटाला लावत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. इतर चालक-वाहकांनी मध्यस्थी करत नेरकर यांची सुटका केली. यानंतर टोळक्याने काढता पाय घेतला बाहेर आल्यानंतर बघून घेतो, असा दम दिला. नेरकर यांनी संशयितांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगत एसटीच्या अधिकाऱ्यांची बोळवण केली. स्थानकात येऊन चालक -वाहकांना जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार वाढल्याने याबाबत पोलिस आयुक्तांकडे कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
गुन्हेगारांचेबसस्थानक :नवीन सीबीएसची गुन्हेगारांचा अड्डा अशी ओळख झाली आहे. स्थानक परिसरात पाकीटमारी, प्रवाशांची लूटमार, चोरी, बसचालकांना मारहाण असे प्रकार येथे घडतात.

बसचालक दहशतीखाली
*हत्याराचाधाक दाखवत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सहकारी वेळेवर आले नसते तर जिवाचे बरे-वाईट झाले असते. पुन्हा नाशिक ड्यूटी घेण्याची मन:स्थिती झाली आहे. एस.जी. नेरकर, चालक

गंभीर प्रकार घडण्याची शक्यता
*स्थानकात गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. प्रवासी पळवणाऱ्या एजंटकडून चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जाते. पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे. गंभीर प्रकार घडल्यास यास जबाबदार कोण? -बी. एम. राठोड, स्थानकप्रुमख
बसस्थानकातील पोलिस चौकी नावालाच
नवीन बसस्थानकातील पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी अभावानेच दिसतात. खासगी ट्रॅव्हल्सचे एजंट पोलिसांच्या समक्ष या बसस्थानकातून प्रवासी पळवतात. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशाने जर अवास्तव भाड्याबाबत तक्रार केल्यास त्यांना या एजंटकडून दमदाटी करण्याचा प्रकारही होतो