आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime New In Sitagumfa At Nashik, Police Injured

सीतागुंफा देवस्थानात पर्यटकांसह पोलिसांवर प्राणघातक हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंचवटीतील प्राचीन सीतागुंफा देवस्थानात भाविकांनी सुट्टे पैसे मागितल्याचा राग आल्याने येथील स्वयंसेवकांनी मध्य प्रदेशातील वृद्ध महिला भाविकासह पुरुषांना जबर मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पंचवटी पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षक हवालदार गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती प्रेमचंद गाग यांच्या फिर्यादीनुसार, मध्य प्रदेशातील छेडावत (जि. धार) येथून बसने (एमपी ०९, ७२११) नाशिक दर्शनासाठी अालेले ५० पर्यटक साेमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सीतागंुफा येथे दर्शनासाठी गेले हाेते. येथील मंदिराच्या स्वयंसेवकाने प्रत्येक भाविकाकडून रुपया घेत पावती िदली. पावतीसाठी गाग यांनी दहा रुपये दिले असता,
त्यांना नऊ रुपये परत देणे अपेक्षित असताना स्वयंसेवकाने ते परत दिले नाही. गाग यांनी पैसे मागितले असता शाब्दिक वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात वृद्ध महिलेस बेदम मारहाण करण्यात आली. परराज्यात असल्याने या भाविकांनी मंदिरातून काढता पाय घेतला. हा प्रकार सीतागंुफा परिसरातील काही स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला. येथे या लोकांकडून नेहमीच त्रास हाेत असल्याच्या तक्रारी असल्याने काही सुजाण नागरिकांनी या भाविकांना थेट पंचवटी पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. भाविकांनी घडलेला प्रकार पाेलिसांना कथन केला. यानंतर या भाविकांसह पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक दिनेश मुळे, पोलिस हवालदार शिवराम खांडवी आणि पथक सीतागुंफा या देवस्थानात आले. त्यांनी या ठिकाणी घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता, मंदिर व्यवस्थापनाचे पदाधिकारी योगेंद्र गोसावी, हिमांशू गोसावी आणि गोरख भुरख यांच्यासह इतरदेखील सुमारे पाच ते सहा संशयितांनी या चाैकशी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरदेखील हल्ला चढवला. यात हवालदार खांडवी यांच्या डोक्यास कोयत्याचा गंभीर मार लागला, तर उपनिरीक्षक मुळे यांचा हात तुटला. दोघांना संशयितांनी बेदम मारहाण केली. काही वेळात पंचवटी, म्हसरुळ पोलिस ठाण्याचे पोलिस पथक दाखल झाले त्यांनी या दोघांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

फक्तएक रुपयासाठी वाद
सीतागुंफामंदिराची धर्मादाय आयुक्तांकडे नोंद नाही. तरी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून येथे असणारे लोक पैसे घेतात. अनेक वर्षांपासून या मंदिरावर मालकी सांगणाऱ्यांकडून लूट होत असल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. एका भाविकाने दहा रुपयांची नोट दिली. संशयिताने रुपये परत देता केवळ एक रुपयासाठी वाद घालत भाविकांनाच प्रचंड मारहाण केली.

रिक्षाचालकांची दादागिरी
सीतागुंफा येथे रिक्षाचालकांकडून भाविकांची लूट केली जाते. स्थानिक नेत्यांकडून यास खतपाणी घातले जात असल्याने येथे भाविकांवर अन्याय होतो. या घटनेत पोलिसांना मारहाण करणाऱ्या एका रिक्षाचालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हणे पोलिसांचीच चूक
या वादानंतर पोलिस ठाण्याच्या आवारात दोन स्वयंसेवकांनी वादाचे पोलिसांवर खापर फोडले. अधिकाऱ्याने योगी भाऊंना मारहाण केल्यानेच पोलिसांवर हल्ला केल्याचे समर्थन केले. येथे वरिष्ठ अधिकारी असता तरी त्यासही मारले असते असे देखील तो म्हणाला.

नाशिकच्या पर्यटन व्यवसायाला यामुळे काळिमा
परराज्यातीलभाविकांसह पोलिसांना अशा प्रकारे केलेल्या मारहाणीच्या घटनांमुळे नाशिक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या घटली आहे. शहरातील देवस्थानावरच मालकी हक्क सांगत मनमानी कारभार सुरू असल्याने धर्मादाय आयुक्तांसह प्रशासनाकडून हे देवस्थान दुर्लक्षित राहिले असल्याने या तथाकथित देवस्थान मालकांची दादागिरी वाढत आहे.

नाशिक नही आयेंगे
भाविकांचीलूटकेली जाते. पावती मागितली म्हणून मारहाण केली. वृद्ध महिलांनाही धक्काबुक्की केली. पोलिसांना मारहाण केली. यानंतर नाशिक दर्शनासाठी येणार नाही. प्रेमचंद गाग, यात्राआयोजक, मध्य प्रदेश