आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळवळकर्स जिमच्या विरोधात लाखाेंच्या फसवणुकीची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जेहान सर्कल परिसरातील तळवळकर्स जिमने सदस्य वाढविण्यासाठी अाकर्षक याेजनांद्वारे गुंतवणुकीचे अामिष दाखवत लाखाेंची फसवणूक केल्याचा अाराेप करण्यात आला असून, सदस्यांनी गंगापूर पाेलिसांत धाव घेतली. जिमच्या व्यवस्थापकांनी अचानक कुलूप ठाेकल्याने सदस्यांमध्ये संताप पसरला अाहे.

तळवळकर सोल्युशन प्रा. लि. कंपनीच्या साखळीतील एक शाखा जेहान सर्कल येथे राहुल तळवळकर यांनी सुरू केली अाहे. यात सुमारे २००हून अधिक सदस्यांकडून ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम ‘मुदत ठेवी’ स्वरूपात स्वीकारल्या अाहेत. या मुदती पूर्ण हाेण्यापूर्वीच जिम बंद केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार सदस्यांनी केली. विशेष म्हणजे, गंगापूर पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी तक्रार दाखल केली नाहीच, उलट ‘तुम्ही ग्राहक मंचाकडे जा’, असा सल्ला देऊन जबाबदारी झटकली.

ही जिम ३० सप्टेंबरपासून कारण देता बंद करण्यात आल्याचे ग्राहकांनी सांगितले. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने राहुल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, काही सदस्यांनी कंपनी मुख्यालयात संपर्क साधल्यावर जागा मालकाशी बोलणी सुरू असून, १९ ऑक्टोबरला जिम सुरू हाेईल, असा ई-मेल सदस्यांना मिळाल्याचे सांगण्यात अाले. प्रत्यक्षात जिम बंद असून, संचालकाचाही संपर्क होत नसल्याने अखेर ६० सभासदांनी पाेलिस ठाणे गाठले.

वरिष्ठनिरीक्षक झाले सल्लागार : ‘हाफसवणुकीचा गुन्हा नाही. ही दिवाणी बाब असून, ग्राहक मंचाकडे जा’, असा सल्ला वरिष्ठ निरीक्षकांनी दिला. तक्रारदारांचे म्हणणेही एेकताच लेखी देत माघारी पाठविले. पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी या प्रकरणी सखाेल तपास करण्याचे आश्वासन तक्रारदारांना दिले अाहे.

लवकरच जिम सुरू होईल
अार्थिककारणांमुळे गंगापूररोड येथील जिम बंद आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेऊन जिम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही सभासदांची फसवणूक होणार नाही. अल्फापटेल, तळवळकर जिम

माहितीनाही
मीसध्या मॅटर्निटी रजेवर आहे. जिम का बंद आहे, याबाबत काहीच माहिती नाही. प्रियंकागोखले, जिम व्यवस्थापकॉ

ई-मेल पाठवूनही जिम बंदच
अार्थिककारणांमुळे जिम बंद आहे. जागामालकांशी बोलणे सुरू असून, १९ सप्टेंबरला जिम सुरू करण्यात येईल, असा ई-मेल राहुल यांनी पाठवला होता. मात्र अद्याप जिम बंदच आहे. - रिकीधोंड, सदस्य

जिम सुरू करा वा पैसे परत करा
हजारोरुपयांची रक्कम भरून जिमचे सभासद झालाे आहोत. संस्थाचालकांनी एक तर जिम सुरू करावी अथवा पैसे परत करावे. आशिषदेशपांडे, सदस्य

अशी होती योजना
वार्षिकसभासद होण्यासाठी ते १२ हजार
फिक्सडिपॉझिट स्कीम : योजनेत१५ हजारांपासून ते ४५ हजारांपर्यत रक्कम ते वर्षांसाठी घेतली जात असे. या योजनेत एफडी जितक्या वर्षांसाठी असेल तेवढी वर्षे फी आकारली जाणार नाही. एफडीची मुदत पूर्ण झाल्यावर पैसे परत केले जाणार हाेते.

लाइफटाइममेंबरशिप : सभासदहोण्यासाठी ३० ते ३५ हजार रुपये फी आकारली जात होती. पावती देण्यासही टाळाटाळ हाेत हाेती.

पनवेलच्या शाखेतही हेच घडले
पनवेलयेथे असलेल्या या जिमच्या एका शाखेतही याच प्रकारची फसवणूक झालेली अाहे. येथील जिम अाजही बंद असून, सभासद अाजही पाठपुरावा करत अाहेत. मात्र ना राहुल तळवलकर उत्तरे देतात, ना अल्फा पटेल उत्तरे देतात, अशी स्थिती अाहे. माझे वीस हजारच रुपये असले तरी अशी या लाेेकांनी किती जणांची फसवणूक केली, हे उघड झाले पाहिजे. डाॅ.सतीश सूर्यवंशी, अभिनेता, मुंबई