आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर परिसरातील नागरिक टवाळखाेरांच्या दहशतीने हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील वाढत्या गुन्हेेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी भाईगिरी रोखण्यासाठी ‘आॅपरेशन भाई’ मोहीमही राबविण्यात येत आहे. असे असताना दुसरीकडे इंदिरानगरवासीय मात्र टवाळखोरांच्या दहशतीला पुरते वैतागले आहेत.
इंिदरानगर परिसरात काही दिवसांपासून टवाळखाेरांकडून रात्रीच्या वेळी गाड्यांच्या काचा फोडणे, दगडफेक करणे असे प्रकार सुरू आहेत. या प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतच असल्याने या भागातील गुन्हेगारीविरोधातदेखील पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते आहे. इंदिरानगर परिसरात काही दिवसांपासून गाड्यांच्या काचा फोडणे, रात्रीच्या वेळी घरांवर दगडफेक करणे असे प्रकार सुरू आहेत. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

गुंडांच्या या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे येथील नागरिकांसाठी अधिक जोखमीचे बनले आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी शहरातील अन्य भागाप्रमाणेच विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पोलिस गस्त वाढवावी
गेल्याकाहीदिवसांपासून रात्रीच्या वेळी गाडीच्या काचा फोडणे, दगडफेकीसारखे प्रकार घडत आहेत. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याकडे गंभीरपणे लक्ष देऊन पोलिस गस्त वाढविण्यात यावी. राजू चव्हाण, नागरिक
बातम्या आणखी आहेत...