आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यालाच उतरवले चेंबरमध्ये, अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कोणत्याहीसफाई कामगाराला ड्रेनेज वा सेफ्टी टँकमध्ये उतरवू नये, असा स्पष्ट आदेश भारत सरकारच्या राजपत्रात असताना सातपूर येथील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना ड्रेनेजच्या चेंबरमध्ये उतरवलेच कसे होते, असा सवाल करीत संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत केली. अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची साधने नसल्यामुळे सिंहस्थासाठी खरेदी केलेले साहित्य गेले कोठे, असा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला.

सातपूर औद्योगिक वसाहतीत गेल्या शनिवारी ड्रेनेजच्या सफाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यातील एक कर्मचारी महापालिकेचा होता. या कर्मचाऱ्यांनी मास्क वा अन्य काेणत्याही सुरक्षिततेच्या साधनांचा वापर केला नसल्याची बाब या वेळी निदर्शनास अाली. भारत सरकारच्या राजपत्रात नमूद तरतुदीनुसार काेणत्याही महापालिकेच्या अथवा ठेकेदाराच्या सफाई कामगाराला ड्रेनेज किंवा सेफ्टिक टँकमध्ये उतरवू नये. तसे करण्याचे अादेश देणाऱ्या अधिकाऱ्याला ते वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडात्मक शिक्षा होऊ शकते. मात्र, असे असताना सातपूर परिसरातील ड्रेनेजमध्ये कर्मचारी उतरल्याने त्यास दोषी संबंधित अधिकाऱ्यालाच धरावे, असेही बोरस्ते आणि बडगुजर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजनांचे नियोजन करण्याची गरजही व्यक्त केली.

‘अग्निशमन’च्या सुरक्षिततेचे काय?
संबंधितकर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांकडेही पुरेशी सुरक्षिततेची साधने नव्हती. दोघा कर्मचाऱ्यांना या ड्रेनेजमध्ये चक्कर आली. बाहेर आल्यावर त्यांना कृत्रिमरीत्या ऑक्सिजन द्यावा लागला होता. संबंधित कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची साधने दिली असती तर ही वेळ आली नसती. तसेच, कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमधील वायूमुळे काही झाले असते तर त्याला जबाबदार कोणाला धरले असते? कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमध्ये अक्षरश: दोरी बांधून उतरवण्यात आले. सिंहस्थासाठी खरेदी केलेली कोट्यवधींची सुरक्षिततेची साधने कोठे गेली, असे सवालही उपस्थित करण्यात आले.