आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीशी विवाहाला नकार दिल्याने, महिलेस मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- मुलीशी विवाहाला नकार दिल्याने तिच्या आईसह मुलास मारहाण, जिवे मारण्याची धमकी मुलीच्या अपहरण प्रकरणी संशयित युवकावर इंदिरानगर पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट पोलिस आयुक्तांकडे या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर इंदिरानगर पोलिसांना उशिरा शहाणपण सुचले. मंगळवारी साधा अर्ज घेण्यास नकार देणाऱ्या वरिष्ठ निरीक्षक हेमंत सावंत यांनी अखेर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी शेख अबीद इस्माइल (२३, रा. शालिमार) या युवकावर गुन्हा दाखल करण्यात अाला असून, युवतीच्या आईने त्याच्याविरुद्ध जिवे मारण्याची धमकी, बेदम मारहाण, मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार देण्यासाठी इंदिरानगर पाेलिसांचा दरवाजा ठाेठावला हाेता. मात्र, तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी तुषार जगताप, जितेंद्र आव्हाड युवा फाउंडेशनचे अध्यक्ष बाळा दराडे, शिवसेनेचे पदाधिकारी सुदाम डेमसे, माजी नगरसेवक सतीश खैरनार यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतला. इंदिरानगर पोलिसांत ते तक्रार देण्यास गेले असता वरिष्ठ निरीक्षक सावंत यांनी उद्धट वर्तन करीत उलट जाब विचारत कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी बुधवारी थेट आयुक्तांची भेट घेतली. याेगेश नाटकर, विलास जाधव, पवन पवार, प्रदीप पेशकार, मयूर माेराडे, विशाल काेिशरे अादींचा सहभाग हाेता. आयुक्तांनी आदेश देताच गुन्हा दाखल झाला.

हिंमत केल्याने घेतली फिर्याद
अनेक दिवसांपासून दबावाखाली वावरणाऱ्या महिलेने अखेर हिंमत केली. घरात घुसून त्यांच्यासह मुलाला लोखंडी रॉड कॅरम बोर्डने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देत मुलीस पळवून नेले, या अाशयाची त्यांची फिर्याद दाखल करून गुन्हा नाेंदवण्यात अाला. इंदिरानगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...