आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळ दत्तक देण्यासाठी मागितले 3 लाख, महाराष्ट्रात येथे चालतोय गोरख धंदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन (जालना) संचालित जळगाव येथील आनंदराज माणकलाल टाटिया शिशुगृहात बाळ विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. या चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव वीरेंद्र धोका यांनी बाळ दत्तक देण्यासाठी तीन लाख रुपये मागितले होते. धोका यांनी पैसे मागितल्याबाबत व्हिडिओ ऑडिओ क्लिपही असल्याचे शिशुगृहातील बाळाचा ताबा घेतलेले वकील त्यांच्या पत्नीने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

टाटिया शिशुगृहातील बाळ सद्य:
स्थितीत वकील दांपत्याच्या ताब्यात आहे. टाटिशा शिशुगृहातून एका दांपत्याने बाळ पळवल्याची तक्रार शिशुगृहाचे व्यवस्थापक हरीश अंबुरे यांनी दिलेली आहे. मात्र, हे सर्व प्रकरण संदिग्ध असल्याचे समोर येत आहे. टाटिशा शिशुगृहातून बाळ पळवलेच नसल्याचे त्या दांपत्याने म्हटले आहे. बाळ दत्तक घेण्यासाठी कराराच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे. नोंदणीनंतर आम्ही टाटिया शिशुगृहात गेलो होतो. त्या वेळी व्यवस्थापक हरीश अंबुरे यांनी आम्हाला बाळ दत्तक देण्याचे मान्य केले होते. त्याबाबत त्यांनी आमच्या घरी येऊन होमस्टडी केली अन् आमची मुलाखतही घेतली. दत्तक घेतल्याबाबतचे टाटिया शिशुगृहाचे पत्रही त्यांनी दाखवले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसे फुटले बिंग...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...