आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Beating Case, Dindori, Nashik, Divya Marathi

ग्राहकाचा हाणामारीत मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी मालक, आचार्‍याला संपविले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरण ढाकणे यांना अशी अमानुष मारहाण करण्यात आली. - Divya Marathi
किरण ढाकणे यांना अशी अमानुष मारहाण करण्यात आली.

दिंडोरी - नाशिक-पेठ मार्गावरील गोळशी फाटा येथील हॉटेल आरती येथे बुधवारी रात्री ग्राहक व हॉटेल कामगारांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी होऊन दोघे गंभीर जखमी व एकाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस येताच गोळशी येथील संतप्त ग्रामस्थांनी हॉटेलवर हल्ला चढविला. या हल्ल्यात हॉटेलमालक रमेश सोनवणे व कामगार मनोज पाटील यांच्यावर कुर्‍हाडीने वार केल्याने ते जागीच गतप्राण झाले. ग्रामस्थांनी संपूर्ण हॉटेलची तोडफोड करून नजीकचा पेट्रोलपंपही पेटवून देण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकाराने उमराळे, गोळशीत तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. बुधवारी रात्री किरण संपत ढाकणे (वय 30, रा. नळवाडपाडा) व त्याचा वाहनचालक र्शीराम पांडू शेखरे (39), रमेश वामन गायकवाड (रा. गोळशी) हे तिघे मद्यपानासाठी आले होते. यामधील एकाने टेबलवरच ओकारी केल्याने हॉटेलच्या कामगार व त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन तिघेही गंभीर जखमी झाले. तेथून ते जीव वाचवत बाहेर पळाले. ढाकणे व गायकवाड जखमी अवस्थेतच रात्री गोळशी येथे घरी पोहोचले. मात्र, शेखरे घरी पोहोचले नसल्याने सकाळी दोघा जखमींसह त्यांच्या नातलग, मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला. तोच हॉटेलसमोरील एका शेतात शेखरे यांचा मृतदेह आढळून आला. त्याचे वृत्त वार्‍यासारखे गावात परसताच सुमारे शे-दोनशेवर महिला व पुरुषांच्या जमावाने हातात लाठय़ाकाठय़ा, लोखंडी गज, कुर्‍हाडी घेत हॉटेलवर हल्ला केला. शेखरे याचा खून हॉटेलच्या कामगारांनीच केल्याच्या संशयाने जमाव हॉटेलवर चालून गेला. हॉटेलमधील टीव्ही, फ्रीज, फर्निचरची तोडफोड करीत मालक रमेश दगू सोनवणे (वय 32, रा. गोळशी) यांच्या अंगावर व जवळच असलेला हॉटेलचा आचारी मनोज ऊर्फ मनोहर राजाराम पाटील (वय 39 रा. अहिमपूर, ता. रावेर) यांच्यावर जमावाने सपासप वार केले. हा प्रकार बघून इतर कामगार हॉटेलमधून पसार झाले.


घटनेचे वृत्त समजताच दिंडोरीचे पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवित हॉटेलमध्ये प्रवेश केल्यावर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. दोघेही जागीच गतप्राण झाले होते. पोलिसांनी पाटील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात, तर शेखरे व सोनवणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी रुग्णालयात पाठविला.


पुढे वाचा घटना टळली असती काय झाले असते?......