आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न झालेल्या 7.5 लाखांच्या लुटीचे नाट्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहाणे सराफ या पेढीत दरोडेखोरांनी गोळीबार केला. मात्र साडेसात लाखांचा ऐवज लुटल्याचा पेढीमालकाचा दावा नाटक असल्याचे तपासाअंती उघड झाले. केवळ जादा नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्याने हा खोटेपणा केल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.
दरोडेखोरांच्या गोळीबारात अभय शहाणे जखमी झाला. दरोडेखोरांनी 10 तोळे वजनाची लगड, 15 तोळे वजनाचे दागिने, मोबाईल व पन्नास हजार रुपये रोख असा सुमारे साडेसात लाखांचा ऐवज लांबविल्याचे त्याने सांगताच पोलिसांची झोप उडाली. गाडी क्रमांक व रंग माहित असल्याने पोलिसांनी तत्काळ केलेल्या नाकाबंदीमुळे काही वेळातच दरोडेखोर हाती लागले. त्यांच्या गाडीत फक्त एक मंगळसूत्र सापडल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांनी कळविले. वातावरण शांत झाल्यानंतर जखमी सागरची पुन्हा चौकशी करण्यात आली. नेमका किती ऐवज गेल्याचे विचारले असता, त्याने पुन्हा एटीएममधून काढलेले 40 हजार, दुकानातील 10 हजार व दागिने असा साडेसात लाखांचा ऐवज गेल्याचा पुनरुच्चार केला. मात्र एटीएममधून एकाचवेळी चाळीस हजार काढता येत नसल्याचे पोलिसांनी लक्षात आणून दिल्यावर मात्र सागर भांबावला. दुसरीकडे, दरोडेखोरांनीही केवळ मंगळसूत्र चोरीची कबुली दिली आणि सागर खोटे बोलत असल्याचे उघड झाले.

रोख रक्कम सुरक्षित
दरोडेखोरांकडे शहाणे ज्वेलर्समधील मोबाईल व दोन ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र सापडले. रोख पन्नास हजार रुपये सराफाच्या घरी सुरक्षित आहेत.नुकसान भरपाई मिळण्यासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरुन सराफाने लुटीचा आकडा फुगवून सांगितल्याचे तपासात स्पष्ट झाले. - डॉ. डी.एस. स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त
(छायाचित्रात जखमी सागर शहाणे)