आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Doctor, Divya Marathi, Police, Arrest

डॉक्टरांकडून 50 हजारांची खंडणी उकळणारे चौघे जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - औषधाच्या बाटलीत किडे पडल्याने प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याचे सांगून डॉक्टरांकडून खंडणी उकळवत, पोलिसांत तक्रार केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या चार संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली. शनिवारी धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर हा प्रकार घडला होता.
नाशिकरोड येथील त्र्यंबक कॉम्प्लेक्समध्ये डॉ. पुरी आयुर्वेदिक प्रॉडक्श्नच्या ‘अमृत हेल्थ ड्रिंक’ या औषधात किडे पडल्याने प्रकृतीत बिघाड झाल्याचे सांगून डॉ. मोहन पुरी यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी भीमराव कोंडाजी आहेर, नितीन भीमराव आहेर (रा. मालेगाव), योगेश चिंतामण जगताप (रा. शिंदे) व अनिल बाविस्कर (रा. पळसे) यांनी केली होती. तडजोडीमध्ये डॉ. पुरी यांच्याकडून संशयितांनी 50 हजारांची रक्कम स्वीकारत पोलिसांत तक्रार केल्यास जिवे ठार मारण्याची आणि अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. डॉ. पुरी यांच्या फिर्यादीवरून संशयितांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक करण्यात आली.