आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोमध्ये तरुणाचा शस्त्राचे वार करून खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिडकोतील पंडितनगर परिसरात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका तरुणाचा धारदार शस्त्राचे वार करून खून करण्यात आला. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
सागर जाधव (वय 22) या सेट्रिंग कामगाराचा संजय अशोक नागरे, विजय नागरे, अशोक नागरे, गणेश नागरे, नाना सानप, मंदा नागरे यांच्याशी वाद होता. शुक्रवारी रात्री सागर त्याच्या घराजवळ असताना पुन्हा वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. शस्त्राने सागरच्या छातीवर वार करण्यात आले. नातेवाइकांनी त्याला रक्तबंबाळ अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अलीकडेच चुंचाळे शिवारातही एका युवकाचा खून करण्यात आला होता.