आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi , Police Beaten Up A Man , Divya Marathi

पोलिसांकडून बेदम मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी मध्यरात्री हॉटेलचा दरवाजा तोडून मालकासह चौघा कामगारांना बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आल्याने स्थानिक पोलिस पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.
हॉटेल मालक शैलेश शेट्टी यांच्या माहितीनुसार, आंबेडकररोडवरील त्यांच्या हॉटेलमध्ये कामगार आवराआवर करत असताना पोलिसांसह काहींनी दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडण्यास उशीर झाल्याने त्यांनी तो तोडून आत येत मारहाण केली. मारहाण झालेल्या दोघांना तर ऊठबसही करता येत नाही.
बार अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे शिष्टमंडळ शेट्टी यांच्यासह पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते मात्र, वरिष्ठ निरीक्षकांच्या बदलीमुळे त्यांना तसेच परतावे लागले. हॉटेल मालकास पाहताच तेथील मारहाण करणार्‍या पोलिसांनी पळ काढला. कारवाईसाठी आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची भेट घेणार असल्याचे संघटनेच्या सदस्यांनी सांगितले. रात्री-बेरात्री मद्याची मागणी करून त्रास दिला जात असल्याची तक्रारही त्यांनी केली.
जनावरांसारखी मारहाण
4 मोबाइल, पैशांची लूट केल्याचे सांगत पोलिस हॉटेलमध्ये घुसले. चौकशी न करता थेट जनावरांसारखी मारहाण केली. - शैलेश शेट्टी
हॉटेल मालकासह संघटनेने केली तक्रार