आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा लांबवले तीन लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बँकेतून रक्कम काढून निघालेल्या दांपत्याला तीन लाखांना लुटल्याची घटना बाॅईज टाऊन स्कूलजवळ बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. महापालिका कार्यालयात ठेकेदाराचे तीन लाख रुपये लुटल्याच्या घटनेस ४८ तास उलटत नाहीत, ताेच पाेलिस अायुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर ही लूट झाली.
मकरंद अात्माराम जाधव व साेनाली जाधव (चेतनानगर, सिडकाे) यांनी गंगापूरराेडवरील एचडीएफसी बँकेच्या थत्तेनगर शाखेतील खात्यातून तीन लाख रुपये काढले. साै. जाधव यांच्या पर्समध्ये ही रक्कम ठेवून दाेघेही दुचाकीने काॅलेजराेडवरून येवलेकर मळामार्गे बाॅईज टाऊन स्कूलच्या मागच्या रस्त्याने तिबेटियन मार्केटच्या दिशेने जात असतानाच मागून वेगात अालेल्या हाेंडा शाईन दुचाकीवरील दाेघांनी पर्स हिसकावली व काही समजण्यापूर्वीच दाेघेही गायब झाले. जाधव यांनी नियंत्रण कक्षात तक्रार देताच सरकारवाडा पाेलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला.
दहा मिनिटे अाधीच बँकेत : जाधव दांपत्य बँकेत पैसे काढण्यासाठी येणार असल्याची माहिती संशयितांना अाधीच असल्याचे स्पष्ट झाले अाहे. संशयित दहा मिनिटे अगाेदरच बँकेत फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून अाले. या दाेघांनाही अाेळखले असून, त्यातील एक बँकेचा ग्राहक तर दुसरा कर्मचारी असल्याचे भासवत फिरताना दिसत असल्याचे पाेलिसांनी सांगितले. उपअायुक्त संदीप दिवाण, उपअायुक्त अविनाश बारगळ, सहायक अायुक्त हेमराजसिंग राजपूत, गंगापूरचे निरीक्षक शंकर काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दिवाण यांनी जाधव दांपत्याकडून घटनाक्रम समजावून घेत त्यांना सराईत गुन्हेगारांची छायाचित्रे दाखविली. परंतु, त्यातून काही हाती न लागल्याने सीसीटीव्ही फुटेजच्या अाधारेच तपास केला जात अाहे.
दाेन्ही घटनांत साम्य : साेमवारी भरदुपारी महापालिकेेच्या मुख्यालयातून एका ठेकेदाराची तीन लाखांची रक्कम हिसकावून पळ काढला हाेता. तेथेही बँकेतून पैसे काढल्यापासूनच पाळत ठेवल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. दुसरी घटनाही त्याच स्वरूपाची असल्याने पाेलिस त्या दिशेने तपास करीत अाहेत. दरम्यान, कृषीनगर जाॅंगिंग ट्रॅक ते तिबेटीयन माकेर्टपर्यंतच्या रस्त्यावर दुपारी सामसूम राहत असल्याने गुन्हेगार फायदा घेत असल्याचे दिसून अाले अाहे. चार महिन्यांपूवी याच भागात पाच लाखांची रक्कम चाेरीस गेली हाेती. मात्र, एकही गुन्हा उघडकीस अालेला नाही.
कार खरेदीचे स्वप्न अपुरे
अभियंता असलेल्या जाधव यांना गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कार खरेदी करायची हाेती. त्यासाठी काढलेली रक्कम ते थेट अंबडला कंपनीच्या शाेरूमध्ये भरण्यासाठी जाणार हाेते. मात्र, पाळत ठेवलेल्या चाेरांनी ती लांबविल्याने जाधव दांपत्याचे कार खरेदीचे स्वप्न तूर्त अपुरेच राहिले.