आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सटाण्यात गुरख्याने केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या गेली दोनवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राध्यापक सागर - Divya Marathi
प्राध्यापक सागर

सटाणा - येथील ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गुरख्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले प्राध्यापक सुनील सागर यांची प्राणज्योत रविवारी उपचार सुरू असताना मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर या हल्ल्यातील मृतांची संख्या दोन झाली आहे.


सटाण्यात 13 फेब्रुवारीला गुरखा बलदेव पाल याने कुर्‍हाडीने हा हल्ला केला होता. त्यात शिपाई दादाजी मगरे यांचा मृत्यू झाला होता. प्रा. सागर आणि प्रफुल्ल ठाकरे हे गंभीर जखमी झाले होते. सागर यांच्या डोक्यास मार बसलेला होता. त्यांच्यावर ‘मविप्र’ संस्थेच्या आडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. हल्ल्यातील दुसरे जखमी प्रा. प्रफुल्ल ठाकरे यांच्यावर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, आरोपी पाल यास सटाणा न्यायालयाने 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. तो कोठडीत रात्री प्रचंड आरडाओरड करतो, त्यामुळे पोलिसांना रात्रभर त्याच्यावर लक्ष ठेवावे लागत आहे. तेथे प्रशासनाने बंदूकधारी पोलिसांचा खडा पहारा ठेवला असून, केलेल्या गुन्ह्याचा पश्चात्ताप होत नसल्याचेच त्याच्या वर्तणुकीवरून जाणवत असल्याची माहिती एका पोलिस अधिकार्‍याने दिली.


कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
सागर यांच्या पार्थिवावर रात्री सटाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी ‘मविप्र’मध्ये सुनील सागर यांनी नोकरी सुरू केली. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच विद्यार्थ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. बारावीला असलेल्या मुलीच्या परीक्षेची तयारी आणि आठवीतील मुलाच्या अभ्यासाकडे त्यांचे सातत्याने लक्ष असायचे. दोन दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा आणि कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवूनही ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. परीक्षा तोंडावर आल्यामुळे मुलांना त्यांची प्रकृती सुधारेल, असा धीर देण्यात येत होता. परंतु, अखेर ते नियतीला मान्य नव्हतेच! वडिलांच्या निधनाचा धक्का त्यांना सहन करावा लागला.