आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण प्रकरणातील संशयित जामिनावर; एक अद्यापही फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी निमाणी परिसरातील मटक्याच्या अड्ड्यांवर छापा टाकत बुधवारी तब्बल १८ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह १५ जणांना ताब्यात घेतले. कारवाई सुरूच राहणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
नाशिक- नंदिनी शर्मा अपहरण प्रकरणातील दाेघा संशयित अाराेपींची बुधवारी न्यायालयाने अटी-शर्थीच्या अधिन जामिनावर मुक्तता केली. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एक अाराेपी अद्यापही फरार असताना दाेघांना जामीन मिळाल्याने पाेलिस तपासाबाबत संशय व्यक्त हाेत अाहे.

सातपूर-अंबड लिंकराेडवरील महेंद्र शर्मा यांच्या चार वर्षाच्या मुलीचे सात महिन्यांपूर्वी अपहरण झाले हाेते. अत्यंत नाट्यमयरित्या घडलेल्या या प्रकरणाचा सातपूर पाेलिसांनी शिताफीने तपास लावला. मात्र, शर्मा यांच्या घरावर काही अज्ञातांनी दस्तक दिल्याने शर्मा कुटुंबीय दहशतीखाली असून, या प्रकरणाचा तपास गांभीर्याने हाेणे अपेक्षित असताना शेख नामक संशयीत अाराेपी अद्यापही फरार दाेघांना जामीन मंजूर झाल्याने पाेलिसांच्या भूमिकेविषयीच संशय व्यक्त हाेत अाहे. दरम्यान, सहायक पाेलिस निरीक्षक माधवी वाघ यांनी अपहरण प्रकरणात पकडलेल्या अाराेपींविराेधात पुरावे मिळालेले असून, फरार अाराेपी लवकरच पाेलिसांच्या ताब्यात येईल, अाश्वासन दिले अाहे.
बातम्या आणखी आहेत...