आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारासह दहा संशयितांवर गुन्हा, बनावट दस्तावेज करून जमीन विक्रीचा प्रकार उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वडिलाेपार्जित मिळकत विक्री करायची अाहे असे सांगत बहिणींच्या हक्कसोडपत्राच्या अाधारे मृताचे बोगस पंचनामे करून जमीन पडिक असल्याचे बनावट कागदपत्राच्या अाधारे दाखवून ती बांधकाम व्यावसायिकास विक्री केल्याचा प्रकार नाशिकराेड येथे उघडकीस अाला अाहे. याप्रकरणी सहा संशयितांसह तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी कोतवालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रकाश ताजनपुरे यांच्या फिर्यादीनुसार संशयित देवराम अरिंगळे, संजय अरिंगळे, रामदास अरिंगळे, दिलीप अरिंगळे, राहुल रामचंद्र, राहुल जोशी यांनी तहसीलदार गणेश राठोड, तलाठी ए. एल. डावरे, मंडल अधिकारी प्रवीण गोंडाळे, कोतवाल गणेश इंगोले यांच्याशी संगनमत करून मिळकत विक्री करण्याच्या बहाण्याने हक्कसोड प्रमाणपत्र घेऊन सुंदराबाई अरिंगळे या मयत झालेल्या महिलेच्या जाहिरातीचे खोटे पंचनामे करून जमीन पडिक असल्याचे दाखवून राठी बिल्डर्स यांना विक्री केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तहसीलदारासह महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.