आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरणपूररोड परिसरात तीन दुचाकी जाळल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शरणपूर रोड येथील सियोननगर येथील एका सोसायटीच्या खाली उभ्या असलेल्या तीन दुचाकी समाजकंटकांनी जाळून टाकल्या. शनिवारी सकाळी हेरंब रेसिडन्सी येथे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रॉनी पवार यांच्या फिर्यादीनुसार सोसायटीच्या पार्किंगमधील एमएच ०२ डीइ १२६३, एमएच १५ इएम ५८८८ एमएच १५ एफए ४९१२ या तीन दुचाकी रात्री पेट्रोल अथवा केमिकलच्या साहाय्याने पेटवून दिल्या. मध्यरात्री वाजता धुराचे लोट पसरल्याने नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. पोलिस नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर काही वेळात पोलिस दाखल झाले. सकाळी सहायक निरीक्षक आर. व्ही. शेगर आणि पथकाने घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, सिडको, कामटवाडे, पंचवटी, उपनगर या भागात दुचाकी जाळपोळीचे प्रकार पोलिसांना उघडकीस आणण्यास अपयश येत असताना, आणखी एक जळीतकांड झाल्याने पोलिस प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.