आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बालकाची सुखरूप सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंचवीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या पाच वर्षीय बालकाची सुटका करण्यात नाशिक पोलिस यशस्वी झाले अाहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाची सूत्रे हाती घेत अवघ्या तीन दिवसांत मध्य प्रदेशातील जबलपूर येथे जाऊन गुन्हा उघडकीस अाणत दाेघांना अटक करण्याबराेबरच बालकाची सुखरूप सुटका केली. शनिवारी (दि. ९) वडनेर गावातून प्रसाद पोरजे याच्या अपहरणाची ही घटना घडली हाेती.

पोलिस महासंचालकांच्या आदेशान्वये बालकाच्या अपहरणाची घटना घडल्यास ‘अॉपरेशन मुस्कान’ राबविले जाते. याअंतर्गतच दोन महिन्यांपूर्वी अंबड-लिंकराेडवरून अपहरण झालेल्या खुशी या तीन वर्षांच्या बालिकेची सुटका केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली. अार्टिलरी सेंटरनजीक वडनेर गावातील शेतकरी संपत पाेरजे यांचा मुलगा प्रसाद (५) यास घराजवळील गाेठ्यातून काेणीतरी चाॅकलेट देण्याचे अामिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली हाेती. या घटनेनंतर काही तासांतच पाेरजेंना माेबाइलवरून मुलाचे अपहरण केल्याचे सांगत त्याच्या सुटकेसाठी २५ लाखांच्या खंडणीची मागणी केली हाेती. पैसे दिल्यास मुलास मारण्याचीही धमकी िदल्याने पाेरजे कुटुंबीयांनी उपनगर पाेलिसांत धाव घेतली. उपअायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक अायुक्त रवींद्र वाडेकर वरिष्ठ निरीक्षक अशाेक भगत यांना प्रकार कथन केला. यात पाेरजेंनी त्यांच्या गाेठ्यात काम करणाऱ्या दाेन परप्रांतीय मजुरांनीच अपहरण केल्याचा संशय व्यक्त केल्याने पाेलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली.
पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन उपअायुक्त धिवरे यांनी उपनगर, नाशिकराेड पाेलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांना तपासाबाबत सूचना देऊन तांत्रिक विश्लेषण शाखेची मदत घेतली. ज्या क्रमांकावरून संपत पाेरजे यांना काॅल अाला, त्याचा माग काढण्यात अाला. याबाबत गाेपनीयता पाळण्यात अाली. पाेरजे कुटुंबीयांनाही चर्चा करण्यास सांगितले. साेमवारी (दि. ११) दाेघा संशयितांना जबलपूर (मध्य प्रदेश) येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात अाले. पाेलिस पथकाने बालकाची सुटका करून नाशकात दाखल झाल्यानंतर त्याच्या अाई-वडिलांच्या स्वाधीन केले