आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन सोनसाखळी चोरांकडून साडेचार लाखांचा माल हस्तगत, आरोपी गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- अंबड पोलिसांना तीन सोनसाखळी चोर पकडण्यात यश आले. चोरट्यांकडून १२ तोळे सोने दुचाकी असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यामुळे सोनसाखळीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून महिला वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

पोलिसांनी तीन गुन्हेगारांना खुटवडनगर येथे शिताफीने पकडले. त्यांनी चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकी ताब्यात घेण्यात आली. संशयित आरोपी अक्षय शिवाजी पाटील (१९), गजेंद्र धनसिंग पाटील (१९) सोमनाथ हिरामण बर्वे (२३) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी अंबड, सातपूर, गंगापूर, इंदिरानगर, सरकारवाडा आदी ठिकाणी सोनसाखळी चोरल्या आहेत.

पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनात उपायुक्त श्रीकांत धीवरे, सहआयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह अंबडचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र सहारे, महेश इंगोले यांनी ही कारवाई केली. चोरट्यांनी अनेक ठिकाणी चोरीची कबुली दिली. विशेष म्हणजे दोघे महाविद्यालयीन युवक असून, पैशाच्या लोभापायी त्यांनी ही चोरी केली.

सोनारांचेलागेबांधे संशयितसाेनसाखळ्या सराफ बाजारातील एका व्यावसायिकाला विकत होते. तो त्यांना त्याची मोड करून देत होता. यामुळे सोनसाखळी चोर सराफांचे लागेबांधे असल्याचे उघड झाले आहे.
पुढीस स्लाइडवर वाचा, तीन मोटारसायकलसह दोन लॅपटॉप हस्तगत, आरोपी गजाआड