आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी वाहन केले नाही; कैद्यांची पोलिसांना मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘कारागृहातून न्यायालयात नेण्यासाठी खासगी वाहन का केले नाही?’ असे म्हणत नाशिकच्या कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांनी शुक्रवारी दाेन पाेलिसांना बेदम मारहाण करून त्यांचे कपडे फाडले. काही महिन्यांपूर्वीच त्र्यंबकेश्वर परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील हे अाराेपी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत असलेले संशयित प्रिन्स चंद्रसेन सिंग, सनी ऊर्फ ललित अशोक विठलकर, निखिल मधुकर निकुंभ, अशोक सुकदेव गायकवाड, अनिल ऊर्फ पवन विजय भोळे आणि शंकर केदू जाधव या सहा कैद्यांना घेऊन अाठ ते दहा पाेलिस न्यायालयाकडे चालले हाेते. मात्र, कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळच संशयित प्रिन्स चंद्रसेन सिंग याने ‘आमच्यासाठी खासगी वाहन का आणले नाही?’ असे म्हणत पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

संजय बाळू जाधव आणि दीपक लालचंद कोळी या पाेलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु सिंगसोबत असलेल्या सनी ऊर्फ ललित, निखिल निकुंभ, अशोक गायकवाड या अाराेपींनी अरेरावी करत जाधव काेळी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना साेडवण्यास गेलेल्या इतर पाेलिसांनाही अाराेपींनी दमबाजी केली. त्यामुळे पाेलिसांनी या अाराेपींना गाडीत कोंबून नाशिक रोड पोलिस ठाण्यात अाणले. तिथे पाेलिसांना मारहाण केल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...