आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस वाहनाने चार ऑटो रिक्षांना उडविले, चालक पोलिस कर्मचारी मद्यधुंद असल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस गाडीत आढळलेली मद्याची बाटली. - Divya Marathi
पोलिस गाडीत आढळलेली मद्याची बाटली.
नाशिक- भद्रकाली पोलिस ठाण्याजवळील फुले मार्केटसमोर बुधवारी रात्री एका पोलिस व्हॅनने उभ्या असलेल्या चार ऑटो रिक्षांना उडविल्याची घटना घडली. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला. चालक पोलिस कर्मचारी मद्यधुंद असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. बुधवारी रात्री १० वाजेच्या संतप्त जमावाची समजूत घालतना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे.
पोलिस वाहनाने रिक्षाला उडविले
सुमारात भद्रकाली परिसरात हा अपघात झाला. गस्त घालत असलेल्या पोलिस वाहनाने (एमएच-१५, इए-०१९६) पोलिस स्टेशनजवळ उभ्या असलेल्या चार रिक्षांना धडक दिली. त्यात शब्बीर अत्तार (रा. कोकणीपुरा, जुने नाशिक) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेनंतर या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी जमावाची समजूत घातल्यानंतर तणाव निवळला.
बातम्या आणखी आहेत...