आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्परला अर्थसहाय्य; संशयिताची जेलमध्ये रवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुख्यात टिप्पर गँगला अर्थसहाय्य केल्याप्रकरणी माेक्काच्या अाराेपाखाली अटक करण्यात अालेल्या संशयित शासकीय पुरवठादार स्वप्नील गाेसावी यास न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली. दरम्यान, गाेसावी यास टिप्परच्या म्हाेरक्या सदस्यांकडून जीविताला धाेका असल्याने त्याची रवानगी अाैरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली अाहे. याच प्रकरणात पाेलिसांकडून पंचवटी परिसरातील आणखी एक सराईत गुन्हेगार रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंबड येथील व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून पाच लाखांची खंडणी मागणारा कुख्यात गुन्हेगार गणेश वाघ उर्फ गण्या कावळ्या, शाकिर नासिर पठाणसह टोळीतील सात गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासात सिन्नर येथील दोन वाळू ठेकेदारांसह मुंबई येथील शासकीय पुरवठादार स्वप्नील गोसावी (रा. तिडके काॅलनी) यास टिप्पर गँगच्या सदस्यांना अर्थसहाय्य केल्याच्या संशयावरून अटक करण्यात अाली अाहे. शुक्रवारी संशयिताची पोलिस कोठडीची मुदत संपली असता विशेष न्यायालयात हजर करण्यात अाले हाेते. याप्रसंगी पाेलिसांकडून संशयित गाेसावी याच्याकडून गँगच्या कारवाया, त्यांना अर्थसहाय्य केल्याचेही विविध पुरावे हाती लागले अाहेत. त्याचबराेबर त्याने न्यायालयाकडे देखील जबाब नाेंदविला असल्याने त्याला न्यायालयीन काेठडी सुनावण्यात अाली.

राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई शक्य
टिप्परगँगला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केल्याच्या संशयावरून सिडकाेतील तीन नगरसेवकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांची चाैकशी करण्यात अाली अाहे. या चाैकशीत संबंधिताकडून अावश्यक माहिती प्राप्त झाली असून, त्यांचा अाणखी काही सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांची चाैकशी हाेऊ शकते. तर, पंचवटी, नाशिकराेड भागातील अाणखी काही नगरसेवक संघटनांच्या प्रतिनिधींचीही चाैकशी हाेणार असल्याचे सांगण्यात अाले. या प्रकरणात अाणखी एकास ताब्यात घेण्यात येणार असल्याच्या वृत्ताला सूत्रांनी दुजााेरा दिला.
बातम्या आणखी आहेत...