आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांना लुटणारा ‘खंडवा’ पुन्हा सक्रिय; पाेलिसही चक्रावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाविद्यालयीन तरुणांना हेरून त्यांना रिक्षा, तर कधी दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेऊन पिस्तूलचा धाक दाखवून लूटमार करणारा ‘खंडवा’ हा सराईत गुन्हेगार शहरात पुन्हा सक्रिय झाला अाहे. अाठ महिन्यांपूर्वी सरकारवाडा पोलिसांनी त्यास जेरबंद केले होते. तेव्हापासून ताे कारागृहात होता. सुटून आल्यानंतर लगेचच त्याने तरुणांची लूट सुरू केल्याने पोलिस यंत्रणादेखील चक्रावली आहे. खंडवाला पकडण्याचे मोठे अाव्हान पोलिस यंत्रणेपुढे उभे ठाकले अाहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडवा या सराईत गुन्हेगाराने सुमारे शंभराहून अधिक महाविद्यालयीन तरुणांची विविध प्रकारे धमक्या देत लूट केली आहे. खंडवा वेशभूषा करण्यात माहीर असल्याने शहरात फिरत असला तरी त्यास सहजासहजी कोणी अोळखणार नाही. स्वातंत्र्य दिनाच्या बंदोबस्तात पोलिसयंत्रणा व्यस्त असताना खंडवाने वडाळागाव परिसरात खोडे नामक विद्यार्थ्यास लुटले. यापूर्वी त्याने इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ खोडेसह इतर महाविद्यालयीन तरुणांना लुटले आहे. खंडवाच्या विरोधात पंचवटी, सरकारवाडा, मुंबईनाका, उपनगर, नाशिकरोड, गंगापूर, भद्रकाली, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत विद्यार्थी लुटीचे गुन्हे दाखल आहेत. आठ महिन्यांपूर्वी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने खंडवाला अशोकस्तंभ परिसरात अटक केली होती. दोषारोपपत्र दाखल करून न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. दोन महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला. मात्र, पोलिसांना वेळीच त्याच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई केल्याने तो मोकाट फिरत आहे. आठ-दहा दिवसांत शहरात एकतरी ठिकाणी विद्यार्थ्यांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत.

अशीकरतो लूट : सधनकुटुंबातील विद्यार्थ्याला हेरून त्यास, ‘तू माझ्या भावाला का मारले, मुलीची छेड का काढली’ असा दम देताे तर कधी कधी सहप्रवासी म्हणून ताे रिक्षात बसतो. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांना रिक्षातून निर्जनस्थळी नेत त्यास पिस्तूल वा शस्त्राचा धाक दाखवत त्याच्या खिशातील पाकीट, गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी बळजबरीने काढून घेतो.

वेशांतर करण्यात माहीर
वेशांतर करण्यात खंडवा माहीर आहे. कधी टक्कल, दाढी तर कधी कमी केस, फ्रेंच कट दाढी-मिशा ठेवून ताे विद्यार्थ्यांना लुटतो. पोलिस कर्मचारी त्याच्या जवळून गेले तरी त्यास ते अाेळखू शकणार नाहीत असे वेशांतर ताे करताे. त्यामुळे तक्रार दाखल केल्यानंतर अाेळख परेडमध्ये ताे विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आजपर्यंत सुमारे शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना त्याने लुटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. भीतीपोटी बहुतांशी विद्यार्थी याबाबत तक्रार करत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...