आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्रीतून फाेडल्या ११ वाहनांच्या काचा, दगड-स्टिकचा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- सातपूर काॅलनी परिसरात बुधवारी (दि. १६) मध्यरात्री अज्ञात टवाळखाेरांनी प्रचंड धुडगूस घालत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांना लक्ष्य केले. काही वाहनांवर दगडांनी तर काही वाहनांवर हाॅकी स्टिकने प्रहार करत काचा फाेडून परिसरात दहशत पसरवली. एकाच रात्री टवाळखाेरांनी १५ ते २० वाहनांच्या काचा फाेडल्या असल्या, तरी तक्रार करण्यास कुणीही पुढे अाल्याने पाेलिसांनी ११ वाहनांची नाेंद केली अाहे. अचानक घडलेल्या या कृत्यामुळे काॅलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीच्या वेळी वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला अाहे. वाहनांच्या काचा फाेडण्याचे सिडकाेतील लाेण अाता सातपूर परिसरातही पसरल्याने रहिवासी चिंतेत अाहेत.

जुन्या सातपूर काॅलनीतून वाहनांच्या काचा फाेडण्याच्या प्रकाराला सुरुवात करण्यात अाली. इम्तियाज शेख यांच्या ‘छाेटा हत्ती’ या वाहनाच्या काचा फाेडण्यात अाल्या. त्यानंतर थाेड्याच अंतरावर असलेल्या ठेकेदार बी. के. सिंग यांच्या कारच्या काचा फाेडून पलिकडच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या कारकडे माेर्चा वळवत तिच्या काचा फाेडण्यात अाल्या. यावेळी वाहनांच्या काचा फुटण्याच्या अावाजाने काही नागरिक जागे झालेही हाेते, मात्र ताेपर्यंत दुचाकीवरून टवाळखाेर फरार हाेत हाेते. जुन्या सातपूर काॅलनीतून टवाळखाेरांनी ‘अाठ हजार स्कीम’कडे जाऊन या परिसरातील कामगार कल्याण केंद्राजवळ उभ्या असलेल्या कारच्या पाठीमागील खिडकीच्या काचा फाेडल्या. तसेच, शिवनेरी चाैकात उभ्या असलेल्या स्विफ्ट कार स्काॅर्पिअाे कारवर दगडफेक करून काचा फाेडल्या. तेथून निघत अानंदछाया परिसरातील साईबाबा मंदिरासमाेर उभ्या असलेल्या अायशर ट्रकच्या काचा फाेडण्यात अाल्या. विशेष म्हणजे, या ट्रकमध्ये चालक झाेपलेला हाेता. गाडीच्या काचा तुटून चालकाच्या अंगावर पडल्याने त्यास किरकाेळ दुखापत झाली अाहे. अॅक्टिव्हासारख्या दुचाकीवरून अालेल्या दाेघांनी काचा फाेडल्याचे ट्रकचालकाने उपस्थितांना सांगितले.

या घटनेनंतर पाेलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. सातपूर पाेलिसांसह शहराच्या विविध पाेलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. टवाळखाेरांनी वाहनांच्या काचा फाेडून दहशत कशासाठी पसरविली याचे कारण मात्र समजू शकले नाही. अफवांनापीक : वाहनताेडफाेडीची घटना सकाळी उघडकीस अाली. सुरुवातीस वैयक्तिक कुणीतरी एकाच वाहनाच्या काचा फाेडल्या असतील असा समज झाला हाेता. मात्र, नंतर एक एक करून अनेक वाहनांच्या काचा फाेडल्याचे उघड हाेत गेले. त्यानंतर मात्र अफवांनाही पीक येत गेले. अशाेकनगर परिसरातील वाहनांच्याही काचा फाेडण्यात अाल्याची चर्चा सुरू झाली हाेती. प्रत्यक्षात मात्र त्या परिसरातील एकाही वाहनाच्या काचा फुटलेल्या नव्हत्या.

अादल्या रात्रीच्या भांडणाचे पडसाद
वाहनांचीताेडफाेड हाेण्याच्या अादल्या रात्री जुन्या सातपूर काॅलनी परिसरात दाेन जणांमध्ये वाद झाला हाेता. या वादातून ‘रात्री तुम्हाला उत्तर मिळेल’, असा इशाराही एकमेकांना देण्यात अाला हाेता. त्याच भांडणाच्या कारणातून हा प्रकार घडल्याची चर्चा सातपूर काॅलनी परिसरात सुरू हाेती.

या वाहनांचे झाले नुकसान
एमएच१५ सीके २५८० (छाेटाहत्ती)
एमएच०४ बीडब्ल्यू ७२८२ (मारुतीझेन)
एमएच१५ बीडी ३०९५ (अल्टाे)
एमएच०४ व्ही ६५६५ (सॅन्ट्राे)
एमएच४१ व्ही १५१२ (मारुतीस्विफ्ट)
एमएच०२ केए १०५८ (सॅन्ट्राे)
एमएच१५ इएक्स ६५८४ (स्विफ्ट)
एमएच१५ बीएक्स ४९६९ (फाेर्डफिएस्टा)
एमएच१५ सीडी २२८८ (स्काॅर्पियाे)
एमएच१५ २९३७ (मारुती८००)
एमएच१४ एएच ६७५ (अायशर)

सातपूर काॅलनी परिसरातील अनेक चाैकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात अाले अाहेत. यातील बहुतांश कॅमेरे बंद स्थितीत तर काही चालू हाेते. काही कॅमेऱ्यांवर झाडाच्या फांद्या अाल्या अाहेत. तरीही काही ठिकाणच्या फुटेजमध्ये दाेघे टवाळखाेर दिसून येत अाहेत. मात्र, याबाबतची माहिती देण्यास पाेलिसांनी असमर्थता दर्शविली.

तपास याेग्य दिशेने
टवाळखाेरांना अाेळखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात अाहे. तसेच, त्यांचा शाेध घेण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात अाले असून, अामचा तपास याेग्य दिशेने सुरू अाहे. -मनाेज करंजे, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...